अपेक्षित लक्ष्य भेदण्या साठी आपल्याकडे स्वयं शिस्तीचा बाण आवश्यक – रणजीत आडसकर शारदा इंग्लिश स्कूल केज येथे स्वयंशासन दिन व इयत्ता दहावीच्या मुलांना निरोप समारंभ संपन्न


केज/प्रतिनिधी
शारदा इंग्लिश स्कूल केज येथे दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ व स्वयंशासन दिनाचे संयुक्तरीत्या आयोजन करण्यात आले होते.सदरील दोन्ही कार्यक्रम अतिशय उत्साहाच्या वातावरणात पार पडले.स्वयंशासन दिनानिमित्त शाळेची सर्व सूत्रे विद्यार्थी व विद्यार्थिनीं यांनी आपल्या हातात घेतले होते.
विद्यार्थ्यांमधून शाळेचे मुख्याध्यापक म्हणून याची निवड झाली तर सर्व शिक्षक व इतर स्थानी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.दिवसभर वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यी,विद्यार्थिनींनी कामकाज पाहिले व अध्यापन केले. विद्यार्थ्यांना शिक्षकाची भूमिका देऊन त्यांना शाळेच्या कामकाजाचा अनुभव देणे,नेतृत्व गुण विकसित करणे, जबाबदारीची जाणीव करून देणे हा यामागचा प्रामुख्याने उद्देश समोर ठेवण्यात आला होता. दुपारच्या सत्रात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभाची आखणी करण्यात आली होती.सदरील कार्यक्रम युवा नेते तथा शाळेचे मार्गदर्शक रणजीत आडसकर यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.
या प्रसंगी कार्यक्रमाचेअध्यक्ष प्राचार्य डॉ.सोनल महेंद्र मिश्रा होते तर व्यासपीठा वर उपप्राचार्य श्री.सुरज सनी,पी.एम.देशमुख याचीप्रामुख्याने उपस्थिती होती.याप्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या शाळेमुळेच आम्ही घडलो असे सांगताना अनेकजण भावविभोर झालेले पहावयास मिळाले. यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले रणजीत आडसकर यांनी सांगितले की,प्रत्येकाला आयुष्यात एक ध्येय किंवा लक्ष गाठवायचे असते. प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी इच्छित लक्ष प्राप्त करण्यासाठी स्वयं शिस्तीत राहणे गरजेचे आहे.
इच्छित लक्ष भेदावयाचे असेल तर स्वयंशिस्तीचा बाण आपल्याकडे असला पाहिजे असे विद्यार्थ्यांना पटवून सांगितले.याच बरोबर गुरुजनांचा आदर करा,थोरा मोठ्यांचा सन्मान करा,नम्रतेचा गुण ठेवा असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सोनल महेंद्र मिश्रा यांनी शाळेच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थी अतिशय गुणी असल्याचे सांगताना जीवनात संघर्ष अटळ असल्याचे त्यांनी सांगितले.काही कालावधीचा संघर्ष जीवनात सुखाची पहाट आणल्याशिवाय राहत नाही असे विद्यार्थ्यांना संदेश दिला.त्यासाठी योग्य ज्ञान मिळवा, कामात सातत्य ठेवा, चुकांमधून शिका असे सांगितले.
उपप्राचार्य सुरज सनी यांनी मार्गदर्शन करताना केरळ राज्याचे उदाहरण दिले देशातील शंभर टक्के साक्षर असलेले राज्य केरळ असून हे सर्व विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे कसे शक्य झाले सउदाहरण सांगितले.या प्रसंगी इयत्ता आठवी नववी व दहावी या वर्गाचे सर्व शिक्षक उपस्थित होते.अतिशय बहारदार सूत्रसंचालन शाळेची विद्यार्थिनीकुमारी आनंदी खोडसे,किमया यादव,पियुषा देशमुख, श्रुती पटाईत यांनी केले तर कार्यक्रमाचा समारोप शाळेच्या वतीने प्रदीप शेटे यांनी केला.



