न्यायसामाजिक

अन्याया विरोधात आज केज शहरामध्ये कॅन्डल मार्च अनुष्काला न्याय देण्यासाठी नागरिक उतरणार रस्त्यावर

केज/प्रतिनिधी

लातूर येथील नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनी अनुष्का हिच्यासंशयास्पद मृत्यू प्रकरणातील दोषींना अटक करून अनुष्काला न्याय मिळावा,या मागणी साठी केज शहरात भव्य कॅन्डलमार्च चे आयोजन करण्यात आले आहे. अन्याया विरोधात आवाज उठवण्यासाठी महिला, युवक व बहुजन समाज मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होणार आहेत.आज शुक्रवार दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौका पासून संविधान चौक,शासकीयविश्रामगृह मार्गे हा कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे.

अनुष्काच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करून खऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी,अशी ठाम मागणी यावेळी करण्यात येणार आहे.या कॅन्डल मार्चचे आयोजन केज शहरातील सर्व सामाजिक संघटना, महिलामंडळे तसेच शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या वतीने करण्यात आले आहे. “अनुष्काला न्याय मिळालाच पाहिजे” या घोषणांनी केज शहर दुमदुमणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते बाबुराव गालफाडे,अनिल लोखंडे व आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!