शैक्षणिक

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ शाळेत जेम्स वॅट शास्त्रज्ञाची जयंती साजरी            

केज/प्रतिनिधी

दि.१९ जानेवारी २०२६ सोमवार रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ केंद्र केज मुलांची ता.केज या शाळेत जेम्स वॅट यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस प्राथमिक पदवीधर शिक्षक डॉ. रामकिशन ग्यानबा मुळे सर व श्री.संदीप मेघराज ठोंबरे सर यांनी पुष्पहार अर्पण करून पुजन करून अभिवादन केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.राजाभाऊ दत्तात्रय कदम अपग्रेड मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ केंद्र केज मुलांची यांनी केले.जेम्स वॅट या शास्त्रज्ञाचा जन्म दि.१९ जानेवारी १७३६ मध्ये ग्रीनॅक स्कॉटलंड मध्ये झाला.

त्यांनी वाफेच्या इंजिनमध्ये सुधारणा करून त्याची कार्यक्षमता आणि उपयोगिता वाढवली. त्यांच्या या सुधारणेमुळे वाफेच्या इजिनचा वापर कारखान्यांमध्ये,खाणी मध्ये व नंतर रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणावर होऊ लागला.त्यांच्या या शोधांनी आधुनिक युगातील औद्योगिक विकासाचा पाया रचला. त्यांनी लॅटिन,ग्रीक आणि गणित विषयांचे अध्ययन केले.त्यांनी चतुर्थ यंत्र, होकायंत्र व दाबमापक इत्यादी उपकरणे तयार केली.अशी माहिती या शाळेतील गणित,विज्ञान विषयाचे प्राथमिक पदवीधर शिक्षक श्री. संदीप मेघराज ठोंबरे सर यांनी दिली.

डॉ.श्री.रामकिशन ग्यानबा मुळे सर,श्री. आबासाहेब तुळशिराम धपाटे सर, श्रीमती अंजली गोविंदराव उटीकर मॅडम,श्रीमती निलावती अनिलकुमार भोरे मॅडम,श्री.आकाश दत्तात्रय लोंढे सर,राहुल बजरंग बचुटे सर,ट्रेनी शिक्षिका रोहिणी श्रीधर काळे मॅडम यांनीही सविस्तर माहिती दिली. सोमवार रोजी बालविवाह प्रतिबंधक शपथ घेण्यात आली व बालविवाह करु नये व त्याबाबत समुपदेशन करण्यात आले.

या कार्यक्रमास श्री. राजाभाऊ दत्तात्रय कदम अपग्रेड मुख्याध्यापक,डॉ. रामकिशन ग्यानबा मुळे सर,श्री.संदीप मेघराज ठोंबरे सर,श्री.राहुल बजरंग बचुटे सर,श्री. आकाश दत्तात्रय लोंढे सर,श्री.आबासाहेब तुळशिराम धपाटे सर, श्रीमती अंजली गोविंदराव उटीकर मॅडम,श्रीमती निलावती अनिलकुमार भोरे मॅडम, ट्रेनी शिक्षिका रोहिणी श्रीधर काळे मॅडम,पीएम पोषणआहार शक्ती निर्माण योजना कामगार स्वर्णमाला पवार व अनिता पवार,विद्यार्थी, विद्यार्थिंनी,  शिक्षणप्रेमी नागरिक अंगणवाडीताई, मदतनीस हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्र संचलन श्री.राहुल बजरंग बचुटे सर यांनी केले व श्री.आकाश दत्तात्रय लोंढे सर यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!