शैक्षणिक

पर्यावरण रक्षणासाठी भूगोल दिन आवश्यक –डॉ.अर्चना वाघमारे

केज/प्रतिनिधी

माऊली विद्यापीठ केज, संचलित सरस्वती महाविद्यालय, भूगोल विभागा कडून भूगोल दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ.जी.बी. पाटील,प्रमुख पाहुणे डॉ. अर्चना वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती सौरभ साळवे (पर्यावरण मित्र),डॉ.नागेश कराळे (भूगोल विभाग प्रमुख) यांची विचार मंचावर उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते पृथ्वीगोल ला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.प्रमुख पाहुण्या प्रा. डॉ.अर्चना वाघमारे यांनी भूगोल दिनाची सुरुवात, भूगोलशास्त्रज्ञ सी.डी देशपांडे यांचे भूगोल विषयातील योगदान आणि भूगोल दिनाच्या माध्यमातून सजीवांच्या अस्तित्वासाठी जनजागृती या विषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले.पर्यावरण मित्र सौरभ साळवे यांनी, जागतिक तापमान वाढ पर्यावरणाचा ऱ्हास पर्यावरण प्रदूषण त्यातून निर्माण झालेली सजीव संबंध परिसंस्था मानवी आरोग्य याविषयी विविध संस्थांचे दाखले देत यासाठी आपली जबाबदारी आणि कर्तव्य याची जाणीव करून दिली.

तसेच समृद्ध व स्वच्छ पर्यावरणासाठी स्वतःपासून सुरुवात करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.नागेश कराळे यांनी केले तर आभार डॉ.मधुकर चाटे यांनी मानले.कार्यक्रमा साठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी, विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!