प्रा.रमेश सरवदे यांचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव,सर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव

अंबाजोगाई/प्रतिनिधी
दि.१८जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता आरंभ बँक्वेट हॉल परेल मुंबई येथे राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा २०२६ आयोजित करण्यात आला होता. समाजात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या व विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या शिक्षकाचा गौरव करण्याच्या उद्देशाने बी.द. चेंज फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ श्री रत्नेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे संगीत विभाग प्रमुख प्रा. रमेश ज्ञानोबा सरवदे यांना प्रदान करण्यात आला.
सदरील सोहळ्या प्रसंगी इंडियन आर्मी मेंबर ऑफ पार्लमेंटचे ब्रिगेडियर सुधीरजी सावंत सर, कमिशनर ऑफ पोलीस श्रीमती रुक्मिणी गलांडे मॅडम,कलर्स मराठी या चॅनलवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील अभिनेत्री निवेदिता पगार, महाराष्ट्र पोलीस मुंबई च्या श्रीमती संध्या निकम मॅडम,एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट त्रिदल सैनिक संघ अँड सैनिक फेडरेशन नाशिकचे श्री.अरुणजी भंडारे साहेब,ब्युरो चीफ सुदर्शन न्युज महाराष्ट्राचे दीपकजी चव्हाण सर इत्यादी मान्यवर मंडळीं च्या उपस्थितीत प्रा.रमेश ज्ञानोबा सरवदे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
त्यामुळे श्री.सोमेश्वर शिक्षण संस्था जिरेवाडी या संस्थेचे सचिव अॕड. गोपाळरावजी कांदे सर संस्थेचे अध्यक्ष गोवर्धन रावजी कांदे सर आणि श्री.रत्नेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सतीशजी किलचे सर यांनी भरभरून कौतुक केले पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या या मिळालेल्या पुरस्काराचे सर्व स्तरावर कौतुक केले जात आहे.व त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.



