गुन्हेगारीसामाजिक

अल्पवयीन परधर्मीय तरुणाने केले अल्पवयीन मुलीचे अपहरण,केज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील एका गावातून एका अल्पवयीन मुलीला एका भिन्न धर्मीय अल्पवयीन तरूणाने अज्ञात कारणा साठी फूस लावून पळवून नेले आहे.गुरूवार दि.२३ एप्रिल रोजी पिडीत मुलीचे आई-वडील हे नातेवाईकांच्या कार्यक्रमा साठी नेकनुर येथे गेले होते.रात्री उशिरा आई – वडील घरी आल्यानंतर त्यांना त्यांची मुलगी घरी नसल्याचे निदर्शनास आल्या नंतर त्यांनी आपल्या नातेवाईकांकडे मुलीचा शोध घेतला.मात्र मुलगी कोणाकडेही आढळून आली नाही.

दरम्यान पिडीत मुलीच्या भावाच्या मोबाईलवर अंबाजोगाई तालुक्यातील एका गावच्या ग्रामपंचायत सदस्याने कळविले की,बेपत्ता असलेल्या तुमच्या मुलीला घेऊन,एक तरुण हा अंबाजोगाई तालुक्यातील त्याचे आजोळ आसलेल्या गावी गेला आहे.पिडीत मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून त्यांच्या गावातील एका तरुणाने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला गावातीलच १६ वर्षीय तरुणाने अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी केज पोलिसात त्या तरुणा विरुद्ध अपहरणाचा गून्हा केज पोलिसात नोंद झाला आहे.पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम हे पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!