सामाजिक
देवगाव येथील जेष्ठ नागरिक रामकिसन मुंडे यांचे वृद्धापकाळाने दुखःद निधन

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील देवगांव येथील रहिवासी जेष्ठ नागरिक रामकिसन पांडूरंग मुंडे वय ९० वर्षे यांचे दि.२८ एप्रिल रोजी मंगळवारी सकाळी वृध्दापकाळाने दुखःद निधन झाले. त्यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. रामकिसन मुंडे यांच्या पश्चात दोन मुले,सुना, मुली,जावाई, नातवंडे अशा मोठा परिवार आहे. देवगांवचे माजी उप सरपंच विठ्ठल मुंडे व उद्योजक नितीन नागरगोजे यांचे ते आजोबा होत.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच परिसरावर शोककळा पसरली आहे.



