प्रशासकीयसामाजिक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहिल्यानगर जिल्ह्यात कोणत्या घडामोडी घडणार,काय करणार याकडे सर्वांच्यां लागल्या नजरा

अहिल्यानगर/प्रतिनिधी

रविवार दि. 5 ऑक्टोबर रोजी केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा अहिल्यानगर जिल्ह्यात दुसऱ्यांदा येत आहेत. मागील दौऱ्या वेळी ही लोणी,शिर्डी परिसरातच आले होते.गेल्या काही दिवसांपासून अनेक समस्यांनी ग्रस्त असलेल्या जिल्हा वासियांना गृह तथा सहकार मंत्र्यांचा दौऱ्याचा काय लाभ होणार ? याची सध्या चर्चा सुरू झाली आहे .

राज्यात व केंद्रात भारतीय जनता पक्ष पक्षाचे सरकार आहे . नगर जिल्ह्यातील शेतकरी,नागरिक, अनेक समस्यांनी ग्रासलेले असताना केंद्रीयमंत्री अहिल्या नगर जिल्ह्यात येत आहेत.एका बाजूला शिर्डी विमानतळाचे आधुनिकीकरण व 2027 च्या कुंभमेळ्या च्या पार्श्वभूमीवर नियोजन होत असताना नगर -कोपरगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 ची पुरती वाट लागली आहे.यापूर्वीच एका केंद्रीय मंत्र्याने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या असे असताना या महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले आहे.त्यामुळे मोठ्या काळा नंतर दुसऱ्यांदा नगर जिल्ह्यात दौरा करणारे केंद्रीय मंत्री अमित शहा काय बोलणार अन काय पाहणार ? याकडे लागले आहे.

दरम्यान, केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा रविवार दि.५ ऑक्टोबर २०२५ रोजी अहिल्यानगरच्या दौऱ्यावर येत असून, सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आणि ग्रामीण विकासाचे अर्ध्वयू माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीत प्रकल्पाचे लोकार्पण त्यांच्या शुभहस्ते आणि मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले असल्याची माहिती डॉ.विखे पाटील कारखान्याचे चेअरमन डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली.

यासंदर्भात माहिती देताना डॉ.विखे पाटील म्हणाले की, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा हे सहकाराच्या भूमीत लोणी येथे दुसऱ्यांदा येत असून,यापूर्वी सहकार मंत्रालयाची धूरा त्यांच्याकडे आल्या नंतर राज्यातीलपहिल्या सहकार परिषदेसाठी त्यांना निमंत्रीत करण्यात आले होते.

लोणी येथील विविध कार्यक्रमांना त्यांना पुन्हा निमंत्रीत करण्यात आले असून ,प्रवरा परिवाराची विनंती मान्य करुन त्यांनी दोन्ही कार्यक्रमांना येण्याचे मान्य केले आहे.या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,विधान परिषदेचे सभापती राम शिंदे,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उप मुख्यमंत्री अजितपवार, केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले, केंद्रीय सहकार राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ  पर्यावरण तथा पशु संवर्धन विकास मंत्री पंकजा मुंडे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह अन्य मंत्री तसेच महायुती चे लोक प्रतिनिधी उपस्थित राहाणार आहेत.प्रवरानगर येथे दुपारी १२ वाजता अमित शहा यांचे आगमन होणार असून, कारखान्याच्या विस्तारीत प्रकल्पाचे उद्घाटन त्यांच्या उपस्थितीत संपन्न होईल.त्यानंतर सर्व मान्यवर लोणी गावात येवून पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आणि माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करतील.

गावातीलच बाजारतळावर दुपारी १ वाजता सर्व मान्यवरांचे सभास्थळी आगमन होणार असून,यासभेस केंद्रीय मंत्री अमित शहा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवर मार्गदर्शन करतील.केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या स्वागताची जय्यत तयारी प्रवरा परिवारा च्या वतीने सुरु करण्यात आली असून, लोणी गावातील बाजारतळावर भव्य सभामंडपही उभारण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!