शैक्षणिकसामाजिक

केज तालुक्यातील साबला येथील भूमिपुत्र ते हैद्राबाद विद्यापीठाचे विभाग प्रमुख डॉ.विष्णु सरवदे

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील साबला या छोट्याशा गावातील डॉ.विष्णु सरवदे या सुपुत्राने उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात गगनभरारी घेतली आहे.गावातील सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या तरुणाने कठोर परिश्रम,चिकाटी व शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर हैद्राबाद येथील नामांकित हैदराबाद केद्रीय विश्वविद्यालया च्या (Central University of Hyderabad)हिंदी विभाग प्रमुखपदाची धुरा सांभाळण्याचा मान मिळवलाआहे.बालपणा पासूनच अभ्यासू वृत्ती व साहित्याविषयी आकर्षण असलेल्या या विद्वानाने प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण केले.

पुढे उच्च शिक्षणा साठी औरंगाबाद येथे शिक्षण घेत असताना त्यांनी हिंदीसाहित्याच्या विविध अंगांचा सखोल अभ्यास केला.संशोधन प्रवण दृष्टी,लेखनाची ओढ आणि अध्यापना तील गोडी यामुळे ते विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय झाले. शिक्षण क्षेत्रात त्यांनी विविध विषयांवर संशोधन करून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिसंवादात प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्या अनेक शोध निबंधांना व पुस्तकांना शैक्षणिक व साहित्य क्षेत्रात विशेष दाद मिळाली आहे.

त्यांनी मुंबई विद्यापीठ, नाथीबाई दामोदर ठाकरशी महिला विद्यापीठ मुंबईच्या हिंदी विभागात देखील विभाग प्रमुख म्हणून कार्य केलेले आहे तसेच ते जर्मनी येथील बॅान विद्यापीठात भारत सरकारच्या भारत सांस्कृतिक संबंध विभागामार्फत हिन्दी विषय शिकवण्याचे काम केले आहे.ते २०१८ पासुन हैदराबाद विद्यापिठात कार्यरत आहेत,त्यांच्या कार्याचा गौरव करून हैद्राबाद विद्यापीठाने त्यांची हिंदी विभाग प्रमुख म्हणून त्याची नियुक्ती केली आहे.या यशामुळे केज तालुक्याचे नाव उज्ज्वल झाले असून साबला गावातील ग्रामस्थांसह संपूर्ण परिसरात अभिमानाची भावना व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांना आदर्श ठरतील अशा त्यांच्या कार्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना प्रेरणा मिळणार आहे.

साबला येथील गावकऱ्यांचे मत “गावातूनच शिक्षण घेत पुढे गेलेल्या आमच्या मुलाने आज हैद्राबाद विद्यापीठात विभाग प्रमुख होणे म्हणजे संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे. हे यश सर्व तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.”या निवडीमुळे त्यांचे साहित्य क्षेत्रातुन व केंद्रीय विश्वविद्यालय हैद्राबाद तसेच केज तालुक्यातुन अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!