शैक्षणिक

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरपिंपळा येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती सोहळा संपन्न

अंबाजोगाई/प्रतिनिधी

दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरपिंपळा येथे स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांची जयंती आणि भारतीय संस्कृतीचे दूत स्वामी विवेकानंद यांची जयंती (राष्ट्रीय युवा दिन) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.माने सर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी श्री.मु.अ. कोरटवाड सर,श्रीमती कापसे मॅडम,  श्री.माने सर,श्री.पोटलावर सर, श्री.पोपलघट सर,श्री. कचकलवार सर आणि श्री.राठोड सर या सर्व शिक्षक वृंदाची प्रमुख उपस्थिती होती.शिक्षकांचे प्रेरणादायी मनोगत या प्रसंगी बोलताना श्रीमती कापसे मॅडम यांनी राजमाता जिजाऊंच्या संस्कारांचे महत्त्व विषद केले.श्री.पोपलघट सर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील ध्येयप्राप्तीचा मंत्र विद्यार्थ्यांना सांगितला. तसेच श्री.कचकलवार सर यांनी आजच्या युवकांनी या महापुरुषांचे विचार आचरणात आणण्याचे आवाहन केले.

विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त मनोगत विद्यार्थ्यांनीही अतिशय तयारीने आपले विचार मांडले.विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊंच्या शौर्यावर पोवाडे आणि स्वामी विवेकानंदांच्या शिकागो परिषदेतील भाषणाचे अंश सादर करून उपस्थितांची मने जिंकली.आम्ही जिजाऊंचे संस्कार जपू आणि विवेकानंदांच्या विचाराने प्रगत भारत घडवू,असा निर्धार विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.अध्यक्षीय भाषण श्री.माने सर यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात सांगितले की, राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद ही दोन व्यक्तिमत्त्वे म्हणजे शक्ती आणि ज्ञानाचा संगम आहेत.

जिजाऊंनी प्रतिकूल परिस्थितीत धैर्य शिकवले,तर स्वामी विवेकानंदांनी जगाला भारताच्या अध्यात्माची ताकद दाखवली. विद्यार्थ्यांनी या महान विभूतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपली शैक्षणिक प्रगती साधावी. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.सिद्धी केंद्रे या विद्यार्थ्यांनीने केले तर उपस्थितांचे आभार श्री.राठोड सर यांनी मानून या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!