भारतीय जनगणना २०२७ चा पहिला टप्पा १ एप्रिल ते सप्टेंबर मध्ये होणार – प्रा.बबनराव आंधळे

बीड /प्रतिनिधी
केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितले आहे की,देशात होणाऱ्या २०२७ च्या जनगणनेचा पहिला टप्पा १ एप्रिल ते ३० सप्टेंबर दरम्यान पार पडेल याची सुरुवात घराची यादी तयार करणे आणि घराचा डेटा गोळा करण्यापासून होईल प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश त्यांच्या परिसरात ३० दिवसात हे काम पूर्ण करण्यात येईल एम एच ए ने अधिसूचना जारी करून सांगितले की, १ एप्रिल पासून देशभरा तील सर्व घरे आणि कुटुंबाची यादी तयारकेली जाईल तसेच कुटुंबाची इतर माहिती देखील गोळा केली जाईल.जेणे करून लोकसंख्या मोजण्याची मजबूत तयारी करता येईल.
सरकारने असे ही म्हटले आहे की,याची यादी तयार करण्यास सुरुवात होण्यापूर्वी पंधरा दिवस लोकांना स्वतः माहिती भरण्याचा (सेल्फ एन्यूमरेशन)पर्याय देखील दिला जाईल वास्तविक पाहता जनगणना २०२१ मध्ये होणार होती परंतु कोरोना महामारीमुळे ती पुढे ढकलण्यात आली होती जी आता २०२७ मध्ये पूर्ण होईल.सरकारने सांगितले की,यावेळी जनगणना पूर्णपणे डिजिटल असेल सुमारे ३० लाख कर्मचारी मोबाईल ॲपद्वारे माहिती गोळा करतील.मोबाईल ॲप पोर्टल आणि रियल टाईम डेटा ट्रान्सफर मुळे जनगणना मोठ्या प्रमाणात पेपरलेस होईल हे ॲप अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हीवर काम करतील.
जातीशी संबंधित डेटा देखील डिजिटल पद्धतीने गोळा केला जाईल.स्वातंत्र्या नंतर पहिल्यांदाच जनगणनेत जातीची गणना समाविष्ट केली जाईल.यापूर्वी इंग्रजांच्या काळात १९३१ पर्यंत जातीआधारित जनगणना झाली होती हा निर्णय पंतप्रधान यांच्या अध्यक्षते खालील कॅबिनेटसमितीने एप्रिलमध्ये घेतला होता. २०११ च्या मागील जन गणनेनुसार भारताची लोकसंख्या सुमारे १२१ कोटी होती ज्यात सुमारे ५१.५% पुरुष आणि ४८.५% महिला होत्या.



