
केज/प्रतिनिधी
दि.१२ नोव्हेंबर बुधवार रोजी येथील साने गुरुजी निवासी विद्यालयात सुलभकांचे जिल्हास्तरीय मुल्यवर्धन प्रशिक्षण ३.० चे उद्घाटन प्रसंगी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अंबाजोगाईचे प्राचार्य डॉ.इब्राहिम नदाफ सर बोलत होते.आज तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय तो या आधी झालेल्या प्रशिक्षणाचे परिणामकारकता आहे.
समाजातील वर्तनात सुधारणा करण्यासाठी, व्याख्यान पध्दतीने अध्यापना ज्ञान न देता अनुभुती मधुन,काव्य, कविताच्या माध्यमातून अध्यापन करुन मुलां मधील मुल्यवर्धित करावयाची आहेत.तसेच मुल्य रुजवायची आहेत. या मुलांमध्ये मुल्य रुजवून वर्धित झाल्यास विद्यार्थ्यां मध्ये संवेदनशिलता येईल व जवाबदारी घेण्यास ते निश्चित समक्ष बनतील व देशाला आहे.
असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. शांतीलाल मुथा फाउंडेशन चे श्री.राजेश्वर यांनी प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ अधिव्याख्याता डॉ.योगेश सुरवसे यांनी यावेळी आपण एकात्मिक पद्धतीने अध्यापन करु त्यावेळेस आपोआप मुल्य शिकवले जातील मुल्यवर्धन प्रशिक्षणातून ऊर्जा मिळणार आहे.तसेच प्रशिक्षणाची पार्श्वभूमी मांडली.
यावेळी सदर प्रशिक्षण हे दुस-या टप्यात चार चार दिवस निवासी स्वरूपाचे असुन पहिल्या टप्प्यात २५० व दुसऱ्या टप्प्यात २०० असे प्रशिक्षणार्थी सहभागी होणार आहेत.पहिल्या टप्प्यात केज, पाटोदा, आष्टी,धारुर,परळी, अंबाजोगाई दि.१२ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे तसेच दुसरा टप्पा १९ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर या कालावधीत संपन्न होत आहे.
या वेळी व्यासपीठावर अँड. उद्धवराव कराड,जेष्ठ अधिव्याख्याता जयपाल कांबळे,जेष्ठ अधिव्याख्याता डॉ.राजेश गोरे उपस्थित होते.तर पहिल्या टप्प्यातील सर्व शिक्षक,शिक्षिकाउपस्थित होत्या कार्यक्रमाचे सुत्र संचालन अरुण शिंदे, यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.कविता गित्ते-कराड मॅडम यांनी मांडले कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व सांस्कृतिक विभाग प्रमुख शेख मॅडम,पवन चंदनशिव,कृष्णा नागरगोजे यांच्या संचाने स्वागतगीत गायन करुन करण्यात आले.



