जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ शाळेत विद्यार्थी दिवस उत्साहात साजरा

केज/प्रतिनिधी
दि.7 नोव्हेंबर 2025 शुक्रवार रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करुन पुजन करून विद्यार्थी दिवस साजरा करण्यात आला. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षण व पुस्तकावर जिवापाड प्रेम करणारे होते.त्यांचा शाळेतील पहिला प्रवेश दिन.
त्यांनी प्रताप सिंग हायस्कुल सातारा या शाळेत दि.7 नोव्हेंबर रोजी प्रवेश घेतला होता. दि.7 नोव्हेंबर हा विद्यार्थी दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला.अशी माहिती आपल्या प्रास्ताविकात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ केंद्र केज मुलांची ता.केज याशाळेचे अपग्रेड मुख्याध्यापक श्री. राजाभाऊ दत्तात्रय कदम यांनी सांगितले.या शाळेतील पदवीधरशिक्षक डॉ.रामकिशन मुळे सर, संदीप ठोंबरे सर यांनी सखोल माहिती देऊन मार्गदर्शन केले.
शिक्षक सर्वश्री आकाश लोंढे, राहुल बचुटे,धपाटे आबासाहेब,शिक्षिका श्रीमती भोरे निलावती मॅडम, श्रीमती उटीकर अंजली,ट्रेनी शिक्षिका काळे रोहिणी यांनी सविस्तर माहिती दिली.या कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षिका,पी एम पोषण शक्ती निर्माण योजना कामगार श्रीमती सुवर्णमाला पवार, विद्यार्थी,विद्यार्थीनी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन इ.7 वी वर्गा तील विद्यार्थीनी सिध्दी विजय थोरात हिने केले. शेवटी शिक्षक राहुल बचुटे सर यांनी आभार मानले.



