सामाजिक

पटसंख्या कमी झाल्याने बंद पडलेली जिल्हा परिषद माध्यमिक शाळा केज चालु करण्यासाठी ६०० माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार,प्रजासत्ताक दिनी मेळाव्याचे आयोजन 

केज/प्रतिनिधी

केंद्रीय मंत्री स्वर्गीय प्रमोद महाजन,कृषी आयुक्त उमाकांत दांगट साहेब यांच्यासह अनेक न्यायाधीश,पोलीस अधिकारी व इतर अधिकारी या जिल्हा परिषद माध्यमीक शाळेने बनवले ती शाळा आज पट संख्येमुळे बंद पडली आहे ती पूर्ववत सुरु करण्यासाठी ६०० माजी विदयार्थ्यांनी संकल्प केला असुन ही शाळा आदर्श बनवण्यासाठी ६०० विद्यार्थी पुढे आले आहेत.

शाळेला गतवैभव मिळूनच देणार असा चंग या विदयार्थ्यांनी बांधला आहे.केज तालुक्यातील एकमेव नावाजलेली जिल्हा परिषद माद्यमिक शाळा केज पटसंख्येच्या अभावी बंद पडली आहे. शाळेची भव्य इमारत विद्यार्थ्यांच्या अभावी धुळखात पडली आहे. अनेक वर्गाची पडझड झालेली आहे.विदयार्थी नसल्याने अनेक शिक्षकाची बदल्या इतर शाळेवर करण्यात आली आहे.केज तालुक्यात २३ खाजगी शाळा आहेत. शहरात अनेक इंग्लिश स्कुल,उर्दू शाळा असल्या मुळे जिल्हा परिषद शाळे तील विद्यार्थी खाजगी शाळेत इंग्लिश स्कुल मध्ये जात होती.खाजगी शाळावाले विद्यार्थ्यांना अनेक प्रलोभने दाखवून या शाळेतील विद्यार्थी घेऊन गेले त्यामुळे शाळेतील विद्यार्थी संख्या घटली परिणामी शाळा बंद पडली.या शाळेत

केंद्रीय मंत्री स्वर्गीय प्रमोद महाजन,कृषी आयुक्त उमाकांत दांगट साहेब सह अनेक न्यायाधीश, पोलीस अधिकारी व इतर अधिकारी या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेने बनवले ती शाळा आज पट संख्येमुळे बंद पडली आहे.या शाळेला भव्य इमारत आहे खेळण्या साठी मोठे मैदान आहे या शाळेने अनेक राष्ट्रीय खेळाडू बनवले आहेत ते खेळाडू आज मोठे अधिकारी,सैन्यदलात अधिकारी सैनिक आपली सेवा बजावत आहेत. शाळेत विदयार्थीनसल्याने वर्ग खोल्या रिकाम्या आहेत.आतील फर्निचर चोरटे पळवत आहेत. इमारतीची पडझड होत आहे.मध्यंतरी समाज माध्यमात शाळेच्या दुरावस्थेबद्दल बातम्या छापून आल्यावर माजी विद्यार्थी व्यथित झाले.

माजी विदयार्थ्यांनी वॉट्सअपवर एक ग्रुप तयार केला त्यात आज १९८० ते १९९५ पर्यंत या शाळेत शिक्षण घेतलेले विद्यार्थी ६०० विद्यार्थी, विद्यार्थीनी जॉईन झाले असुन येत्या २६ जानेवारी ला हे सर्व एकत्र येऊन मेळावा घेणार आहेत.

मेळाव्यात पुढील कार्यक्रमाची दिशा ठरवून २०२६ या वर्षात जुन पासुन शाळेत पटसंख्या वाढवुन पाचवी ते दहावी पर्यंतचे वर्ग सुरु करण्या साठी गरजु गरीबांचे मूले जे विदयार्थी परिस्थिती मुळे शिक्षण घेऊ शकत नाहीत असे विद्यार्थी शोधून वर्ग सुरु करण्या साठी प्रयत्न करत आहेत त्यात शाळेच्या वर्गाची दुरुस्ती,फर्निचर, विदयार्थ्यांना मोफत शालेय साहित्य देणे इत्यादी कामे मे महिन्यात पूर्ण करून शाळा सुरु करणार आहेत.ही जिल्हा परिषद माध्यमिक शाळा इतर तालुक्यासाठी पण आदर्श ठरणार आहे या कार्यासाठी ६०० विद्यार्थी व इतर सामाजिक संस्था मदत करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!