अध्यात्मिक

बुरंडवाडीत मंगळवारी ह.भ.प.श्रीराम महाराज विडेकर यांचे कीर्तनाचे आयोजन,कै.पंडित भोसले यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे औचित्य

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील बुरंडवाडी (विडा) येथील डॉ.विश्वनाथराव कराड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील आदर्श शिक्षक कै.पंडित बळीराम भोसले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित श्रीमद् भागवत कथेची सांगता मंगळवारी दि.१३ जानेवारी रोजी ह.भ.प महंत श्रीराम महाराज विडेकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाने होणार आहे.

गेल्या वर्षभरापूर्वी कै.पंडित भोसले यांचे दुःखद निधन झाले होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बुरंडवाडी येथे गेली सात दिवसांपासून अध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असुन ह.भ.प.पुरुषोत्तममहाराज शास्त्री यांच्या रसाळ वाणीतून श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचेआयोजन करण्यात आले होते.या कथेचा लाभ घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.या धार्मिक महोत्सवाची सांगता मंगळवारी दुपारी १० ते १२ या वेळेत ह.भ.प.महंत श्रीराम महाराज विडेकर,साधू शिवरामपुरी मठ संस्थान विडा यांच्या सुश्राव्य कीर्तनाने होणार आहे.

विडेकर महाराजांचेकीर्तन ऐकण्यासाठी वारकरी सांप्रदायातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.कीर्तन सोहळ्यानंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. कै.पंडित भोसले यांनी डॉ.विश्वनाथराव कराड विद्यालयात सहशिक्षक म्हणून प्रदीर्घ काळ सेवा बजावली होती.त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कार्याची आठवण म्हणून भोसले परिवाराने हा धार्मिक उपक्रम राबवला आहे.या कीर्तनसोहळ्यास आणि महाप्रसादास जास्तीतजास्त भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन भोसले परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!