अध्यात्मिकसामाजिक

महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला प्रेम वाटत फिरणारे प्रेममूर्ती ह.भ.प. समाधान महाराज शर्मा ,सौ.दिपालीताई काटे यांचे समाधान महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त गौरवोद्गार 

मी तीस वर्षांपूर्वी समाधान नावाचा एक तरूण गुरुजी सोबत पहिल्यांदा पाहिला तेंव्हा वय आणि व्यक्तिमत्त्व यांचा मेळ बसवता आला नाही,पण एक निरागस सगळ्या जगाला आपलंच मानत,हक्काने सगळ्यांना आपलसं करत लाघवी व्यक्तिमत्त्व मला दिसलं. प्रेमाचा हक्क गाजवत असतानाच, जगाचे नियम, परंपरा,बंधन या सगळ्यांना तोडत मोडणारा एक बंडखोर मुलगा ही त्यात दडलेला होता पण ज्याला त्याच्यातला प्रेमळपणा दिसला त्यासाठी तो प्रेमळ आणि ज्यांना त्याच्यातील बंडखोरी दिसली त्यांच्यासाठी बंडखोर पण दोन्हीतही एक रुप म्हणजे माणुसपण.

आणि अशा या गुणांवगुणांना स्पर्श झाला गुरुजी नावाच्या परीक्षांचा,ज्याला अत्यंत प्रेमाने,हळुवारपणे,पैलू पाडत असताना या पैलूं वर काम करताना गुरुजींना या मुलांच्या अविचल निष्ठेवर खुश होऊन आपला वसा दिला,टोकगाठणं या स्वभावामुळे आणि मुळातच असणाऱ्या प्रेम आणि आनंद या गुणांमुळे गुरुजींचा वसा चालवत जगाला आपलं करत निघाला,ज्याच्यावर प्रेम केलं त्यांच्यासाठी काहीही करण्याची तयारी,मन एखाद्या लहान मुला सारखे असल्याने कधी नियमांची फिकीरच नाही त्यामुळे नियमात चालणाऱ्यांना हा हट्टी, अहंकारी,बनेल, फसवेगिरी करणारा ही वाटला.पण गुरुजींना हे अवलीया पण मान्य नव्हते.

अत्यंत प्रेमाने गोंजारत हे सगळं बाजूला सारत गुरुजींच्या याउनाड लेकराचं एक परीपक्वं माणूस म्हणून निष्ठेच्या जोरावर प्रभूचे,सृष्टीचे नियम जाणत जगाला प्रेमाचं व आनंदाच दान गुरुनिष्ठेच्या किंमतीवर देत आहे.कोणी त्याला देव केलं,कोणी गुरु मानले, कोणी उर्जावान,कोणी महात्मा,कोणी आपल्या प्रश्नांची सोडवणूक करणारा मसिहा मानलं.

या सगळ्याहून एक रुप फार कमी लोकांना कळलं ते रुप म्हणजे एक निरागस बालक जे केवळ आणि केवळ प्रेम आणि आनंदाला आसुसलेलं आहे.तो बालक मात्र कोरा चं राहिला.कुटुंबपरिवारात सगळीकडे तो निरागस पणे तो ते निखळ प्रेम आनंद शोधत गेला.त्याला ते कुठेच मिळेना, सापडेना.जगाला हे कधी कळलचं नाही की, दात्यालाही कधी प्रेम आणि आनंद देणारं कोणी हवं असतं.तो बालक ते प्रेम आणि आनंद शोधत आहे.कुटुंबात,परिवारात जे तो जगाला देत आहे.

मानसन्मान,किर्ती,पैसा, प्रतिष्ठा जग जे मिळविण्या साठी धडपडतेय ते सगळं या बालकाला किरकोळ वाटतं प्रेम आणि आनंद यापुढे.असामान्य गुणांनां ही सहज बाजूला सारून सामान्यांना आनंद देत राहण्याचा हाच याचा वसा.गुरुजी या निरागस बालकाला कधी मी पणा आणि अहंकाराचा वारा न लागो यासाठी कृपा करा. आणि हट्टी पण निरागस बालकाला ते प्रेम आणि आनंद द्या हीच आपल्या गुरु चरणी नम्र विनंती.

या वेड्या बालकाला द्या गुरुजी एवढं असे मनोगत

सौ.दिपाली संतोष काटे

रामकृष्ण परमहंस परिवार केज ता.केज, जि.बीड यांनी ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांच्या वाढदिवसा निमित्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!