
बीड/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात पणन महासंघा मार्फत सुरू करण्यात आलेल्या सोयाबीन खरेदी केंद्रावर बारदाना कमी पडत आहे त्यामुळे सोयाबीन खरेदी बंद झालेली आहे या खरेदी केंद्रावर तातडीने बारदाना उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी ग्रामीण युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा बीड जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक प्राध्यापक बबनराव आंधळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड करण्यात आलेली आहे खरेदी केंद्रावर सोयाबीन ची अचानक आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे परंतु जिल्ह्यातील पणन महासंघाच्या ४८ खरेदी केंद्रावर मागील सहा ते सात दिवसापासून बारदाना उपलब्ध नसल्याने सोयाबीन खरेदी करण्याचे काम पूर्णतः ठप्प झालेले आहे.

परिणामी हजारो शेतकऱ्यांना आपली सोयाबीन विक्री करता येत नसून त्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शेतकऱ्याचा हा प्रश्न शासनाने तात्काळ मार्गी लावावा म्हणजे बीड जिल्ह्यातील सर्वसोयाबीन खरेदी केंद्र सुरू होतील सोयाबीन खरेदी केंद्रावर तात्काळ बारदाना उपलब्ध न करून दिल्यास ग्रामीण युवक संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा प्राध्यापक बबनराव आंधळे यांनी दिला आहे.



