
बीड/ प्रतिनिधी
पोकरा(नानाजी देशमुख) कृषीसंजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे मंजुरी दिल्यानंतर ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे 11 तालुक्यामधील 396 गावांची या योजनेमध्ये निवड करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग, ठिबक सिंचन संच, वैयक्तिक शेततळे,शेडनेट गृह,विहीर पुनर्भरण यासह इतरकामे करण्यात येणार आहेत जागतिक बँकेच्या सहकार्यातून पोकरा हा प्रकल्प राज्या मध्ये राबवला जात आहे. पोकराचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारने दुसरा टप्पा जाहीर करून त्यामध्ये बीड जिल्ह्यातील 396 गावाची निवड करण्यात आली आहे.
या गावांमध्ये काम करण्यास सुरुवात झालेली आहे संबंधित शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहेत त्यामध्ये बीड तालुक्यातील 39 शिरूर 20 आष्टी 37 पाटोदा 27 अंबाजोगाई 68 परळी 80 केज 23 माजलगाव 34 धारूर 22 गेवराई 40 आणि वडवणी तालुक्यातील 06 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे.
यामध्ये शेतकऱ्यांना बांबू लागवड फळबाग लागवड ठिबक सिंचन संच वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण, शेडनेट गृह,हरित गृह, गांडूळ खत,विहीर पुनर्भरण,पाईप व पंप संच(अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील लाभार्थी) बीजे उत्पादन, रेशीम उद्योग,शेततळ्या तील मत्स्यपालन, शेळीपालन,(भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती विधवा परितक्त्या व घटस्फोटीत महिला) सदर प्रकल्पाच्या शेतकरी भूमीहिन कुटुंबातील व्यक्ती, कृषी व्यवसाय घटका अंतर्गत शेतकरी उत्पादक संघटना म्हणजेच (शेतकरी उत्पादक कंपनी शेतकरी गट),महिला स्वयंसहाय्यता बचत गट, ग्राम संघ,प्रभाग संघ, लोकसंचालित साधन केंद्र यांना लाभ देण्यासाठी घटकाच्या मार्गदर्शक सूचना प्रकल्पाच्या mahapocra.gov.in या संकेतस्थळावर शेतकऱ्यांना अर्ज दाखल करता येणार आहेत.
यामध्ये बीड जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याच्या आवाहन ग्रामीण युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बबनराव आंधळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.



