गुन्हेगारीसामाजिक

सोशल मीडियावरून 150 हून अधिक महिलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवणाऱ्या आरोपीला अटक

केज/प्रतिनिधी

पोलीस ठाणे धारूर येथील गु.र.नं.198/ 2026 मधील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी सुनिल गिताजी गिरी याला केज पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी सोशल मीडिया वरून महिलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांची आर्थिक व शारीरिक फसवणूक करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

नेमकं प्रकरण काय?

दि.17 मे 2026 रोजी 03-53 वाजता धारूर पोलीस ठाण्यात एका महिलेने तक्रार दाखल केली होती.त्यानुसार गु.र.नं.198/2026, कलम 69,115(2), 352,3(5) BNS 2023 सह अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या कलम 3(2)(va), 3(1)(w)(i)(ii) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अटक आणि तपास

पोलीस अधीक्षक,बीड व अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलीस अधिकारी केज यांच्या पथकाने तपास केला. सहायक पोलीस अधीक्षक श्री.वेंकटराम (भा.पो.से.)यांच्या नेतृत्वाखाली पोह/996 डापकर,पोहे/1384 चोपने, पोह/390 इनामदार,पोअं/1647 इनामदार,चापोह/1340 माने व चापोअं/361 करांडे यांच्या पथकाने आरोपीचा शोध घेतला.

आरोपी सुनिल गिताजी गिरी,रा.जमालपूर ता. औसा जि.लातूर,हल्ली मु.इंद्रायणी नगर लातूर याला दि. 4 एप्रिल 2026 रोजी अटक करण्यात आली.त्याला न्यायालयात हजर करून पीसीआर घेण्यात आला आहे.गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल व अँड्रॉइड मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

गुन्ह्याची पद्धत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपीच्या मोबाईलची तपासणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. 150 हून अधिक महिलांना टार्गेट करण्यात आले.आरोपी व्हॉट्सअ‍ॅप,इन्स्टाग्राम, फेसबुक व स्नॅपचॅटच्या माध्यमातून 150 पेक्षा जास्त महिलांना मेसेज करून प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत होता.

शारीरिक व आर्थिक फसवणूक

तक्रारदार महिलेला नऊ महिने लातूर व पुणे येथे सोबत ठेवून तिच्याशी सतत शारीरिक संबंध ठेवले.तसेच तिच्याकडून 40 हजार रुपये रोख व 2/3 तोळे सोने घेऊन खर्च केले.पैसे संपल्या नंतर महिलेस त्रास देऊन हाकलून दिले.

पोलिसांचे आवाहन

सदर आरोपी हा सोशल मीडियाचा वापर करून महिला व मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यात सराईत आहे.त्यामुळे त्याच्या पासून व इतर संशयित सोशल मीडिया आयडी पासून सर्वांनी सावध राहावे.कोणत्याही भूलथापांना व प्रलोभनांना बळी पडू नये व अशा प्रकारचे फसवणूक करणाऱ्यां पासून दूर राहावे,असे आवाहन उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय,केज यांनी केले आहे.

पथकाचे अभिनंदन

ही कामगिरी मा.पोलीस अधीक्षक बीड,अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.वेंकटराम व त्यांच्या संपूर्ण पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!