किल्लेधारूर न्यायालय परिसरात जागतिक पर्यावरणदिनी वृक्षारोपण

किल्लेधारूर/प्रतिनिधी
किल्लेधारूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय परिसरामध्ये जागतिक पर्यावरण दिना निमित किल्ले धारूर न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्री.एन.एम. वाली साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच किल्लेधारूर न्यायालयातील सरकारी वकील ॲड.एस.एन. थेरोकार साहेब यांच्या हस्ते देखील वृक्षारोपण करण्यात आले,याप्रसंगी किल्लेधारूर वकील संघाचे अध्यक्ष ॲड. पी.पी.शिनगारे साहेब तसेच वकील संघाचे सर्व पदाधिकारी हे देखील उपस्थित होते .
तसेच हे वृक्षारोपण विविध प्रकारचे झाड त्यामध्ये चिंच,आंबा,पेरू व जांभळ यांचे वृक्षारोपण केलेले आहे या प्रसंगी सर्व मान्यवरांनी झाडाची काळजी घेतली जाईल असे सांगितले.या जागतिक पर्यावरण दिनी किल्ले धारूर न्यायालया तील ॲड.निंगुळे साहेब, ॲड.अहंकारे साहेब, ॲड.गडदे साहेब,ॲड. नखाते साहेब,ॲड.फुन्ने साहेब, ॲड.ईखे साहेब, ॲड.भोसले साहेब तसेच कर्मचारी होळंबे साहेब, मुंडे साहेब,मस्के साहेब व पटाईत साहेब तसेच शिपाई माने साहेब, अन्सार मामू आदी या प्रसंगी हजर होते.



