सामाजिक

केज येथील माऊली इलेक्ट्रिक मोटर्स शोरूम चा भव्य शुभारंभ उत्साहात संपन्न

केज/प्रतिनिधी

केज शहरातील बीडरोड वरील टीव्हीएस शोरूम जवळ माऊली इलेक्ट्रिक मोटर्सचा भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.वाढत्या प्रदूषणाला आळा बसावा आणि नागरिकांना पर्यायी,पर्यावरणपूरक वाहतूक सुविधा मिळाव्यात या उद्देशाने पत्रकार नंदकुमार मिसाळ व मच्छिंद्र लांब यांनी या शोरूमची सुरुवात केली आहे.उद्घाटन प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती, केजचे उपसभापती डॉ. वासुदेव नेहरकर यांच्या हस्ते फीत कापून शोरूमचे उद्घाटन करण्यात आले.तसेच ईश्वर मुंडे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून शोरूमचे विधिवत उदघाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाला केजच्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा डॉ.सौ. सीताताई बनसोड, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते हारुणभाई इनामदार, भाजपाचे माजी सभापती विष्णू घुले,युवा नेते सुरज घुले,कानडीमाळी सरपंच राऊत सर, भाजपा केज तालुका अध्यक्ष भगवान केदार,माजी जिल्हा परिषदसदस्य संतोष हांगे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.योगिनी थोरात, रिपाई तालुका अध्यक्ष सुनील हिरवे, तांबवा गाव चे सरपंच अरुण आबा चाटे,आरपीआय तालुका अध्यक्ष दीपक कांबळे, सुनील हिरवे यांच्यासह पत्रकार व अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पर्यावरणपूरक वाहतुकीला चालनादेणारी ही नवी इलेक्ट्रिक मोटार सायकल सेवा केज शहरातील नागरिकांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.शोरूमच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान,उत्कृष्ट सेवा आणि वाजवी दरात इलेक्ट्रिक वाहनांची उपलब्धता राहणार असल्याचे शोरूमच्या मालकांनी सांगितले.कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांचे शुभेच्छापर भाषणे झाली.आभार प्रदर्शन पत्रकार चंद्रकांत पाटील यांनी केले. अल्पोपहारानंतर कार्यक्रम संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!