सामाजिकसाहित्यिक

स्वानंद सार्वजनिक वाचनालयात भारतीय संविधानाचा ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त संविधान वाचन पंधरवाडा चे उद्घाटन संपन्न.

केज/प्रतिनिधी

स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता.केज जि.बीड येथे भारतीय संविधानाच्या ७५ व्या अमृत महोत्सवा निमित्त संविधान वाचन पंधरवडाचे दि.१४ ते २९ डिसेंबर २०२५ या कालावधीत संविधान वाचन पंधरवाडा चे उद्घाटन स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा,धारूरचे मॅनेजर महेश दादा आनंदगावकर, बँकेचे कर्मचारी,यशवंत कुमार अनपर्ती,मनिष लाल, चैतन्य र.बनसोडे,अनंत तिवारी,शंतनू गोखले, गौरव मडावी,अद्वैत आनंदगांवकर,दादासाहेब गायकवाड,वैरागे एस.के, रावसाहेब जाधव,नारायण गायकवाड,माजी सरपंच रामराजे गायकवाड, रमेशराव गायकवाड, अरुण गायकवाड, रविंद्र गायकवाड,बाळासाहेब गायकवाड यांच्या उपस्थितीत व ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष,जेष्ठ विचारवंत,जेष्ठ समाज सेवक,महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते व परखड व्याख्याते, प्राचार्य,डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन झाले.

या कार्यक्रमाला ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड, कृष्णराजे गायकवाड, शौर्य गायकवाड,कु.विरा सोनवणे, कु.दिव्या साबळे कु.कल्याणी घोगले,कु. लक्ष्मी चौरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक छगननाना गायकवाड यांच्यासह विद्यार्थी,युवक,जेष्ठ नागरिक,वाचक, हितचिंतक,ग्रामस्थ यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.या निमित्ताने भारतीय संविधानाचे वाचन करण्यात आले, ग्रंथवाचनासह ग्रंथप्रदर्शन ही घेण्यात आले.दि.१४ ते २९ डिसेंबर २०२५ या कालावधीत विविध कार्यक्रम व उपक्रम राबवून हा भारतीय संविधान पंधरवडा राबविला जाणार आहे.

या वेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केला.कार्यक्रमाचे प्रास्तविक,सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!