शैक्षणिक

विद्यार्थ्यांनो भारत देशाचे तुम्ही भावी आधारस्तंभ आहात – आदर्श शिक्षक नरहरी काकडे

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील कानेश्वर विद्यालय, कानडीमाळी या विद्यालयात इयत्ता दहावी वर्गाच्या वतीने स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला.आजच्या स्वयं शासन दिना निमित्त मुख्याध्यापक म्हणून कु.स्वप्नाली खाडे तसेच लिपीक म्हणून स्नेहल सांजुरे तर सेवक म्हणून श्रीनिवास खाडे यांनी काम पाहिले.आजच्या या स्वयंशासन दिन कार्यास मार्गदर्शन कानेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष गरडे यांनी केले.

स्वयंशासन दिन या कार्यक्रमाच्या प्रसंगी मार्गदर्शन करत असताना आदर्श शिक्षक नरहरी काकडे यांनी असे म्हटले की तुम्ही सर्व विद्यार्थी व विद्यार्थींनी यांनी आजच्या कार्यक्रमाचे नियोजन हे एकदम चांगल्या प्रकारे केले.त्याचप्रमाणे तुम्ही चांगला अभ्यास करा जास्तीत जास्त चांगले गुण घ्या आणि तुमचे तुमच्या कुटुंबाचे,तुमच्या शाळेचे तुमच्या गावाचे नाव उज्वल करा.

या कार्यक्रमा प्रसंगी माझ्या वतीने मी तुम्हांला सर्वांना तुमच्या भावी आयुष्या साठी तुमचे पुढीलआयुष्य सुखी,समाधानी, निरोगी, आनंदी जावो अशा प्रकारच्या शुभेच्छा माझ्या वतीने व कानेश्वर विद्यालय कानडीमाळी तसेच सर्व कर्मचारी सहकारी बांधवांच्या वतीने देतो.या वेळी उपस्थित कानेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष गरडे आदर्श शिक्षक अनंत गवळी,अरुण गिते, सिध्दार्थ राऊत,आत्माराम राऊत इत्यादी कर्मचारी सहकारी उपस्थित होते. या स्वयंशासन दिन कार्यक्रमास कानेश्वर विद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थींनी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला व हा कार्यक्रम यशस्वी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!