
केज/प्रतिनिधी
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ केंद्र केज मुलांची ता.केज या शाळेत क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस या शाळेतील इ.६ वी व इ.७ वी वर्गातील विद्यार्थीनींनी पुष्पहार अर्पण करून पुजन करून अभिवादन केले. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचा जन्म महाराष्ट्रा तील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ३ जानेवारी १८३१ रोजी झाला.
वडील खंडोजी नेवसे पाटील हे होते व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या ९ व्यावर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी विवाह झाला.त्या महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती होत्या. त्यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यात भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली.त्यांचा १० मार्च १८९७ रोजी मृत्यू झाला.३ जानेवारी हा दिवस बालिका दिन, महिलामुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो.त्यांनी समाज सुधारणा चळवळ करुन अनेक उत्कृष्ट कामगिरी केली.आजही समाजाने त्यांच्या कार्याचा आदर्श घेण्यासारखे त्यांनी उत्कृष्ट कार्य केले.असे आपल्या प्रास्ताविकात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ केंद्र केज मुलांची ता.केज शाळेचे अपग्रेड मुख्याध्यापक श्री. राजाभाऊ दत्तात्रय कदम यांनी सांगितले.
यावेळी या शाळेतील आदर्शप्राथमिक पदवीधर शिक्षक डॉ.श्री. रामकिशन ग्यानबा मुळे सर,श्री.आकाश दत्तु लोंढे सर,राहुल बजरंग बचुटे सर,प्राथमिक पदवीधर शिक्षक श्री.संदीप मेघराज ठोंबरे सर,श्री.आबासाहेब तुळशिराम धपाटे सर, श्रीमती भोरे निलावती आनंदराव मॅडम,श्रीमती उटीकर अंजलीगोविंदराव मॅडम,ट्रेनी शिक्षिका रोहिणी श्रीधर काळे – थोरात मॅडम यांनी सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमात इ.१ ली ७ वी वर्गातील या शाळेतील जवळपास ८०विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.तसेच काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थिनींनी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर आधारित अनेक गीत सादर केली.या कार्यक्रमा निमित्त रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येऊन प्रोत्साहनपर बक्षीस वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमास यागावचे सरपंच श्री अविनाश पांचाळ,उपसरपंच,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा सौ.शालु विजय थोरात,उपाध्यक्षा सौ. अश्विनी श्रीकांत थोरात, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सौ.संध्या अशोक थोरात,ग्रामपंचायत सदस्य,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,शिक्षण प्रेमी नागरिक,अंगणवाडी ताई,मदतनिस,पीएम पोषण शक्ती निर्माण कामगार सुवर्णमाला पवार,अनिता पवार, मातापालक असे अनेक गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन इ ७ वी वर्गातील आर्या अमोल थोरात या विद्यार्थीनींने अतिउत्कृष्ट केले.आभार पद्मजा थोरात या विद्यार्थिनीने मानले.



