क्रिडाशैक्षणिक

साने गुरुजी निवासी विद्यालय येथे तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात संपन्न 

केज/प्रतिनिधी

क्रीडा व युवक संचालनालय,महाराष्ट्र राज्य, गटशिक्षणाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन साने गुरुजी निवासी विद्यालय केज येथे मोठ्या उत्साहात पार पडले.या स्पर्धेचे उद्घाटन प्रा.डॉ. कविताताई कराड मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी अॕड.उद्धव राव कराड यांची प्रमुख उपस्थिती होती.उद्घाटन प्रसंगी प्रा.डॉ.कविताताई कराड मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यां मध्ये शिस्त,संघ भावना, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास वाढतो. शिक्षणासोबतच खेळाला महत्त्व दिल्यास सर्वांगीण विकास साधता येतो. त्यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेताना खेळाडू वृत्ती जपावी असे आवाहन केले.

अॕड.उद्धवराव कराड यांनी क्रीडा स्पर्धांचे महत्त्व विशद करताना सांगितले की,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपली क्रीडा कौशल्ये दाखवण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वाचे व्यासपीठ ठरतात.येथूनच भविष्यातील उत्कृष्ट खेळाडू घडतात.या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आहे.कबड्डी,खो-खो, धावणे,उंचउडी,लांबउडी यांसह विविध मैदानी व मैदानी क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक वृंद,क्रीडा शिक्षक व आयोजक समितीने परिश्रम घेतले आहेत.

या कार्यक्रमाच्या वेळी केज तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक,क्रीडा शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनानंतर स्पर्धांना सुरुवात झाली असून, पुढील काही दिवस ही क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!