रामराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी,सावित्री आजही सुरक्षित नाही. – प्रा.डॉ. वृषाली गिरी

केज/प्रतिनिधी
रामराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केज येथे सावित्रीबाई फुले जयंती अतीशय उत्साही वातावरणात पार पडली. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा.मुख्याध्यापक श्री.गोरे सर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ.वृषाली गिरी व अश्विनी उगले उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांचे विचार मांडले.
प्रमुख अतिथी उगले मॅडम यांनी मुलांमध्ये अजूनही मुली कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेला दिसत नाही अशी खंत व्यक्त केली.प्रा.डॉ. वृषाली गिरी यांनी सावित्रीबाईं फुले यांच्या काळातील सामाजिक परिस्थिती,महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि यासर्व दृष्टीने सावित्रीबाई यांनी खडतर परिस्थितीत केलेले कार्य याबाबत सखोल मार्गदर्शन करत आजच्या काळातही महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा दुषित आहे.
आजही समाजात महिला व मुली कशा असुरक्षित आहेत हे मांडत खऱ्या अर्थाने जर महिला मुक्ती दिन साजरा करायचा असेल तर महिला भितीमुक्त होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.जर समाजात खऱ्या अर्थाने समानता आणायची असेल तर कायदे करून उपयोगाचे नाही तर मानसिकता बदलली पाहिजे असे मत व्यक्त केले.अध्यक्षीय समारोप करताना गोरे सर यांनी महान व्यक्तींच्या जीवन कार्यातून,विचारातून प्रेरणा घेऊन आपल्या जीवनात त्यांचे विचार रुजवायला हवेत असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाईकनवरे यांनी केले तर आभार प्रदर्शन देशमुख यांनी केले.या कार्यक्रमासाठी रामराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील गायकवाड दांगट,सरवदे,वायबट, देवकते,देशमुख,सोनवणे, शेख,चाळक,शिंपले पवार व सरस्वती प्राथमिक विद्यालयाचे रसाळ,घुले, चाटे,गवळी उपस्थित होते तसेच दोन्ही विद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



