कोठी येथे श्री भावार्थ रामायण अयोध्या कांड सोहळा उत्साहात संपन्न युवानेते विष्णुभाऊ घुले यांची उपस्थिती, भावपूर्ण रामकथा वाचनाने भक्तीमय वातावरण

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील कोठी येथे आयोजित श्री भावार्थ रामायणाच्या प्रारंभीय सोहळ्यानिमित्त अयोध्या कांडाच्या समाप्ती कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले.या प्रसंगी साधु शिवरामपुरी मठ संस्थान, वरपगाव येथील मठाधिपती ह.भ.प.श्री. महंत भगवान महाराज शास्त्री यांनी अत्यंत भावपूर्ण व रसपूर्ण रामकथा वाचन करून उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले.
या धार्मिक सोहळ्यास भाजपचे युवा नेते विष्णुभाऊ घुले यांनी आवर्जून उपस्थित राहून रामकथेचे श्रद्धेने श्रवण केले.यानंतर त्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.कार्यक्रमास कोठी गावासह पंचक्रोशीतील रामभक्त,धार्मिक बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पूर्णतः भक्तीमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यामध्ये श्रीराम भक्ती,सामाजिक एकता व संस्कारांचे जिवंत दर्शन घडले.धार्मिक परंपरा जपणारा आणि समाजात सद्भावना वृद्धिंगत करणारा हा कार्यक्रम सर्व उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.



