कोल्हेवाडी येथील तुळजाई मंदिर सभामंडप बांधकामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

केज/प्रतिनिधी
केज विधानसभा मतदार संघात विविध विकास कामांना गती देण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. कोल्हेवाडी येथील श्री. तुळजाई मंदिर परिसरात सभामंडपाच्या बांधकामा साठी मंजूर झालेल्या कामाचा भूमिपूजन सोहळा गावात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
हे काम भाजपा ज्येष्ठ नेते नंदकिशोरकाकाजी मुंदडा यांच्या सहकार्यातूनआणि केज मतदारसंघाच्या आमदार सौ.नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या आमदार निधीतून मंजूर करण्यात आले आहे. स्थानिकांच्या दीर्घकालीन मागणीचा विचार करून हे काम तातडीने हाती घेण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
विशेष म्हणजे,नंदकिशोर काकाजी मुंदडा यांच्या निर्देशानुसार या कामाचा शुभारंभ भारतीय सैन्यात सेवेत असलेल्या गावातील दोन वीर जवान सतीश मेजर मिसाळ, ज्योतीराम मेंजर मिसाळ यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला.
जवानांच्या हस्ते भूमिपूजन होणे हा गावासाठी अभिमानाचा क्षण ठरला असून उपस्थित ग्रामस्थांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.यावेळी कोल्हेवाडी गावातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ,स्थानिककार्यकर्ते, बांधकाम समिती सदस्य, महिला,पुरुष भक्तगण उपस्थित होते.भूमिपूजना नंतर सभामंडपाचे काम तातडीने सुरू करण्यात आले असून आगामी काही महिन्यांत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तुळजाई मंदिर परिसरात हा सभामंडप उभारला जाणार असल्याने सामाजिकसांस्कृतिक कार्यक्रम,धार्मिक उत्सव आणि ग्रामविकासासाठी हे ठिकाण महत्त्वाचे केंद्र ठरेल,अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. तसेच या विकासकामा बद्दल आमदार नमिताताई मुंदडा आणि काकाजी मुंदडा यांच्या नेतृत्वाची उपस्थितांनी प्रशंसा केली.



