शिक्षक कॉलनी,केज येथे श्रीगुरु दत्त जयंतीचा उत्साह ; महिला भजनी मंडळाच्या सुमधुर भजनांनी उत्सवाला आली रंगत!

केज/प्रतिनिधी
श्रीगुरु दत्त जयंतीचा उत्सव येथील शिक्षक कॉलनी परिसरात मोठ्या भक्तिमय आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात महिला भजनी मंडळाच्या सुमधुर भजनांनी उत्सवात मोठी भर घातली,तसेच महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
भजनी मंडळाचे सुश्राव्य गायन सकाळ पासूनच शिक्षक कॉलनीमध्ये उत्सवाचे वातावरण होते. भजनी महिला मंडळींनी भजने गाऊन गुरुदत महाराजांची आराधना केली.संपूर्ण परिसर भक्ती रसात न्हाऊन निघाला होता.महिलांच्या भजनी गीतांमुळे उपस्थितांना एक वेगळाच आध्यात्मिक आनंद मिळाला.
फुलांची उधळण करून जयंती उत्सव संपन्न भजनी गीते संपल्यानंतर, ठिक दुपारी बारा वाजता फुलांची उधळण करीत अत्यंत उत्साहात श्रीगुरु दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांनी दत्त महाराजांचा जयघोष केला.महाप्रसादाचा लाभ
जयंती उत्सव साजरा झाल्यानंतर लगेचच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महिला मंडळी,नागरिक आणि युवकांनी मोठ्या संख्येने कडी,भात,आणि तुपातली लाफसी या महाप्रसादाचा लाभ घेतला.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम व
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक कॉलनी भागातील अनेक मान्यवरांनी आणि महिलांनी पुढाकार घेतला.यामध्ये पञकार प्रकाश मुंडे,संदीप भुतडा, नारायण घुले,सुर्यभान धस अण्णा,अमोल घुले, मुळे बापू,अरुण बप्पा धस,गोटू भैय्या पाळवदे यांनी विशेष परिश्रम घेतले.सर्व कार्यकर्त्यांच्या आणि शिक्षककॉलनीतील महिलांच्या सहकार्याने हा गुरुदत्त जयंती उत्सव अत्यंत भक्तिमय आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.



