प्रेमसंबंध तोडलेल्या तरुणीचा जुन्या प्रेमिकाच्या घरात घुसून गोंधळ,युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील एका गावात प्रेमसंबंध तुटल्या नंतरही एका तरुणीने जुन्या मित्राच्या घरात घुसून गोंधळ व गैरवर्तन केल्याची घटना घडली असून,या प्रकरणी तरुणी विरोधात युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गून्हा नोंद करण्यात आला आहे.केज तालुक्यातील ढाकेफळ येथील एक तरुण लातूर येथे सेवेत कार्यरत आहे.
त्याचे आणि त्याच गावातील एका तरुणीचे पूर्वी मैत्रीपूर्ण संबंध होते.मात्र, नातेवाईकांच्या विरोधा मुळे दोघांमधील प्रेमाचे संबंध नोटरीद्वारे शपथपत्र तयार करून संपुष्टात आणले होते.दि.१४ डिसेंबर रोजी त्या तरुणाच्या लहान भावाच्या लग्नाची सुपारी फोडण्याचा कार्यक्रम ढाकेफळ येथे सुरू असताना या तरुणीने अचानक घरात आली व गोंधळ घातला.
उपस्थितांनी तिला समजावून सांगितल्या नंतर नातेवाईकांच्या उपस्थितीत दोघांमधील संबंध पूर्णतः संपल्याचे लेखी शपथपत्र तयार करण्यात आले.तरीही, सोमवारी दि.२२ डिसेंबर रोजी रात्री सुमारे साडे आठ वाजण्याच्या दरम्यान ही तरुणी पुन्हा त्या तरुणाच्या घरात घुसून व दरवाजावर थुंकली.यावेळी तरुणाच्या वडिलांनी जाब विचारला असता तिने त्यांना शिवीगाळ करून आता मी घराबाहेर जाणार नसल्याची धमकी दिली. व गंभीर परिणामांची भाषा करून ती घटना स्थळावरून निघून गेली.
या घटनेनंतर तरुणाच्या वडिलांच्या तक्रारीवरून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात या तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शना खाली जमादार केशव खाडे करीत आहेत.



