येवता येथे दोन गटात तुफान मारामारी,आठ जणांवर परस्पर विरोधी गुन्हे

केज/प्रतिनिधी
विहिरीच्या पाण्यावरून दोन भाऊ एकमेकांना भिडले.त्यांनी कुऱ्हाड, कत्ती आणि काठीने एकमेकांना मारहाण केल्याने दोघे जण जखमी झाल्याची घटना येवता येथे घडली.याप्रकरणी दोन्ही गटाच्या आठ जणांविरुद्ध परस्पर विरोधी केज पोलिसात गुन्हे नोंद झाले आहेत.
येवता येथील मल्हारी लक्ष्मण सक्राते वय ५३ वर्षे यांच्या फिर्यादीनुसार ते बुधवारी दि.१७ डिसेंबर सायंकाळीं साडेसहा वाजण्याच्या दरम्यान स्वतःच्या शेतात असताना तेथे अशोक लक्ष्मण सक्राते हा सख्खा भाऊ, प्रणव अशोक सक्राते, समाधान अशोक सक्राते, शिवकन्या अशोक सक्राते आले व या शेतातील विहिर आमची आहे,तु पाण्याची मोटार चालू करू नकोस असे म्हणून शिवीगाळ केली.आपण बारीबारीने पाणी घेऊ असे त्यांना म्हणालो असता अशोक याने कुऱ्हाडीने हल्ला करून ती डोक्यात मारून जखमी केले.व इतरांनी काठीने व चापटाबुक्याने मारहाण करीत आमच्या विहिरीजवळ पाऊल ठेवायचा नाही.नसता जिवे मारून टाकू अशी जीवे मारण्याची दिली. मल्हारी सक्राते यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
दुसऱ्या गटाचे प्रणव अशोक सक्राते यांच्या फिर्यादीनुसार बुधवारी दि. १७ डिसेंबर रोजी ते विहिरीवर मोटार चालू करण्यास गेले असता त्यांचे चुलते मल्हारी लक्ष्मण सक्राते,दिपक मल्हारी सक्राते,प्रविण मल्हारी सक्राते,शारदा मल्हारी सक्राते हे तेथे आले.व विहिरीवरील मोटार चालु करू नकोस, विहिर व पाण्याची मोटर आमची आहे.असे म्हणून शिवीगाळ करून चापटा व लाथाबुक्यानी मारहाण केली.तर मल्हारी सक्राते यांनी धारदार कत्तीने हातावर मारून जखमी केले व इतरांनी दगडाने मारून मुकामार दिला.व विहिरीजवळ पुन्हा पाऊल ठेवल्यास तुम्हाला जिवे मारून टाकीन अशी जीवे मारण्याची धमकी दिली. प्रणव सक्राते याच्या फिर्यादी वरून चौघां विरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शना खाली जमादार हनुमान मुंडे हे पुढील तपास करीत आहेत.



