ऊसतोड मजूर बहिणी सोबत गेलेल्या बारा वर्षाच्या बालिकेवर अत्याचार

केज/प्रतिनिधी :
वडील कर्नाटकात ऊस तोडणीसाठी गेले,आई भोळसर असल्यामुळे ती नातेवाईककडे असते. अशा परिस्थितीत सहावी च्या वर्गात शिक्षण घेणारी बारा वर्षाची बालिका ऊसतोड मजूर बहिणी सोबत गेली असता, ऊसतोड पत्नीला भेटण्या साठी आलेल्या लक्ष्मण उर्फ सागर निवृत्ती वाघमारे वय ३४ वर्षे रा. सोमनाथ बोरगाव ता. अंबाजोगाई या नराधमाने या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार केल्या प्रकरणी युसूफवडगाव पोलिसात मंगळवारी पोस्को सह अत्याचाराचा गून्हा नोंद झाला आहे.
पळून जाणाऱ्या आरोपीला पिंक पथकाचे प्रमुख पोलीस उप निरीक्षक प्रकाश शेळके यांनी बुधवारी सायंकाळी कळंब बस स्थानकातून जेरबंद केले आहे.धारूर तालुक्यातील ऊसतोड मुकादम सुजित वैरागे यांचेकडून उचल घेतल्यानंतर आपल्या पतीसह ऊसतोडणीसाठी आलेल्या बहिणीसोबत बारा वर्षाची लहान बहीण ही आली होती.
केज तालुक्यातील भालगाव शिवारातील दत्ता मोरे यांच्या शेतातील उसाचे ट्रॅक्टर भरण्यासाठी सोमवारी रात्री सर्व मजूर गेले असता,शौच्यासाठी गेलेल्या बारा वर्षीय बालिकेचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली.ही माहिती आपल्या बहिणीला समजल्यानंतर पिडीत बालिकेच्या बहिणीच्या फिर्यादीवरून लक्ष्मण उर्फ सागर निवृत्ती वाघमारे वय ३४ वर्षे रा. सोमनाथ बोरगाव ता. अंबाजोगाई याच्या विरुद्ध पोक्सोसह अत्याचार केल्या प्रकरणी युसूफ वडगाव पोलिसात गून्हा नोंद झाला आहे.
आरोपी जेरबंद
पोस्को व अत्याचारचा गून्हा नोंद झाल्यानंतर कळंब बस स्थानकावरून पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या लक्ष्मण उर्फ सागर निवृत्ती वाघमारे याला बुधवारी रात्री सात वाजता जेरबंद केल्याची माहिती पिंक पथकाचे प्रमुख पोलीस उप निरीक्षक प्रकाश शेळके यांनी दिली आहे.दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.



