सामाजिक

महिलांच्या स्वावलंबना साठी येडेश्वरी फाउंडेशन चा पुढाकार,केज येथे टेलरिंग,केक मेकिंग,अरी वर्क,व्यवसाय मार्गदर्शन प्रशिक्षणाचे आयोजन

केज/प्रतिनिधी

येडेश्वरी फाउंडेशन,केज यांच्या वतीने महिलांच्या आर्थिक व सामाजिक स्वावलंबनासाठी टेलरिंग प्रशिक्षणासह केकमेकिंग, अरी वर्क तसेच व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता पुन्हा एकदा विविध प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असल्याची माहिती फाउंडेशनच्या प्रमुख सौ. शितलताई लांडगे यांनी दिली आहे.

या उपक्रमा अंतर्गत विधवा,परितक्ता व एकल महिलांसाठी मोफत टेलरिंग प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, रोजगार व स्वयंरोजगारा च्या संधी उपलब्ध व्हाव्यात,हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे.प्रशिक्षणास दि.३ जानेवारी पासून सुरुवात होणारअसून प्रशिक्षणाचा कालावधी एक महिना राहणार आहे.प्रशिक्षणा साठी आधार कार्ड,पॅन कार्ड,टी.सी.व चार फोटो आवश्यक असून प्रशिक्षण शुल्क ३०० रुपये इतके आहे.

अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी इच्छुक महिलांनी येडेश्वरी फाउंडेशन कार्यालय, केज येथे संपर्क साधावा किंवा मोबाईल क्रमांक ९५६१९१०२९६ वर संपर्क करावा,असे आवाहन सौ.शितलताई लांडगे यांनी केले आहे. महिलांनी या सुवर्णसंधी चा लाभ घ्यावा,असेही त्यांनी नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!