शैक्षणिकसामाजिक

केज येथील साने गुरुजी निवासी विद्यालयात तालुकास्तरीय मूल्यवर्धन 4.0 प्रशिक्षणाचा तिसरा टप्पा सुरू,प्राचार्य डॉ. कविता कराड यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न 

केज/प्रतिनिधी

केज शहरातील साने गुरुजी निवासी विद्यालय येथे सोमवारी तालुका स्तरीय मूल्यवर्धन 4.0 प्रशिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन प्रा.डॉ. कविता कराड यांच्या हस्ते संपन्न झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरुण शिंदे सर हे होते. उद्घाटन सत्रात मदने सर,चंद्रकांत मुंडे, संध्याराणी कोल्हे मॅडम, विक्रम डोईफोडे यांसह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.प्रा.डॉ. कविता कराड यांनी मूल्यवर्धन 4.0 उपक्रमाचे उद्दिष्ट,विद्यार्थ्यांमध्ये विकसित होणाऱ्या कौशल्यांचे महत्त्व तसेच अध्यापनातील नाविन्य पूर्ण पद्धती याबाबत मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणातून शिक्षकांना नवनवीन अध्यापनतंत्रांचा वापर, विद्यार्थी केंद्रीत पद्धतींचा अवलंब आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढी साठी आवश्यक असलेली साधने प्राप्त होणार असल्याचे मान्यवरांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे शिक्षक साखरे सर यांनी शाळेच्या वतीने केले. तालुकास्तरीयशिक्षकांच्या उपस्थितीत तिसरा टप्पा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.तदनंतर 4.0 चा उद्घाटन समारंभ संपन्न झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!