केज शहरातील सर्वज्ञ करियर अकॅडमीचा यशाचा झेंडा,१५ विद्यार्थ्यांची पोलीस भरतीत बाजी,आई- वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवा -डॉ. हनुमंत सौदागर

केज/प्रतिनिधी
जिद्द,प्रयत्न,सातत्य, आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून परिश्रम घेतल्यास यश निश्चित प्राप्त होते असे मत डॉ.हनुमंत सौदागर यांनी व्यक्त केले.ते केज येथील सर्वज्ञ करियर अकॅडमीत पोलीस भरती मध्ये निवड झालेल्या १८ विद्यार्थ्यांसह पालकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. हनुमंत सौदागर,प्रमुख उपस्थिती विक्रम डोईफोडे,विष्णू यादव, रामदास वाघमारे,श्री. रसाळ,शिवाजी मिसाळ, संचालक दत्ता बांगर, अमोल गुंठाळ,सतीश शिंदे,श्रीमती बांगर, आदींच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी आणि पालकांचा सत्कार करण्यात आला.यामध्ये
अंगद बिक्कड(कोल्हापूर पोलीस),केशव माळी (पुणे शहर पोलीस), ज्ञानेश्वर राऊत (पुणेशहर पोलीस),अशोक गवळी (धाराशिव पोलीस), युवराज काळे (बीड पोलीस),महेश राऊत (बीड पोलीस),आरती जाधव (वर्धा पोलीस) प्रतीक्षा मुंडे (धुळेपोलीस) रूपाली चाटे (सोलापूर ग्रामीण पोलीस), गजानन डोईफोडे (आर्मी),वैभव माळी (आर्मी),अभिषेक शिंदे (आर्मी),कृष्णा केदार (आर्मी),ज्ञानेश्वर बांगर (आर्मी), सर्जेराव वनवे (आर्मी),महेश गायकवाड (विद्युत सहाय्यक), परमेश्वर घुले (विद्युत सहाय्यक)आदीं ची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी डोईफोडे म्हणाले ऊसतोड मजुरांच्या मुलांनी यश संपादन करून आई-वडिलांच्या हातातील कोयता खाली ठेवला याचा आनंद असल्याचे मत व्यक्त केले पुढे बोलताना डॉ.हनुमंत सौदागर म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि क्षमता आहे. यामुळेच ते चमकले जातात असे मत व्यक्त केले.यशस्वी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना मेहनत घेतल्याचे फळ मिळाले अंगावर खाकी वर्दीचे स्वप्न साकार झाले असे मनोगत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी रात्रंदिवस मेहनत घेतली.ग्रामीण भागातील आणि सामान्य कुटुंबातील मुलांनीअत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे यश मिळवले असल्याचा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डोईफोडे यांनी केले आभार बांगर यांनी मानले.



