सामाजिक

केज येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी,भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाने दिली शिस्तबद्ध मानवंदना

केज/प्रतिनिधी

विश्वरत्न,बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त केज शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा व समता सैनिक दल,केज यांच्या वतीने स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसर येथे अभिवादन कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते.सकाळी ठीक १० वाजता मुख्यस्मारका जवळ भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आणि समता सैनिक दलाचे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले. कार्यक्रमाची सुरुवात महामानवाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि त्रिशरण-पंचशील ग्रहणाने झाली.यावेळी समता सैनिक दलाच्या सैनिकांनी आपल्या पूर्ण गणवेशात शिस्तबद्ध पद्धतीने बाबासाहेबांना सामुदायिक मानवंदना अर्पण केली.

भारतीय बौद्ध महासभेचे केज शहर अध्यक्ष जयपाल मस्के यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कार्यक्रमाचे चोख नियोजन करण्यात आले होते.मुख्य स्मारकावरील अभिवादनानंतर, भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाच्या पथकाने शहरातील विविध प्रभागांमधील जयंती उत्सव समित्यांना भेटी दिल्या.प्रत्येक ठिकाणी बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करून मानवंदना देण्यात आली,ज्यामुळे केज शहरातील वातावरण अधिकच चैतन्यमय झाले होते.

या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे शहर सरचिटणीस शिवकुमार मस्के, कोषाध्यक्ष तथा समता सैनिक चंद्रकांत मस्के, माजी शहराध्यक्ष डॉ. प्रभाकर ठोके,बळीराम सोनवणे,नंदकुमार मस्के, भारत ढालमारे,नवनाथ सोनवणे,राजू घोडके, अजय गालफाडे,कल्याण मस्के,दिपक मस्के, प्रेमकुमार गायकवाड, महिला समता सैनिक ज्योती सोनवणे,मैनाबाई भालेराव तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या महिला शाखेच्या शहर अध्यक्षा सुनीता कांबळे व सर्व सन्माननीय पदाधिकारी, समाजबांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.समता सैनिकदलाने दाखवलेली शिस्त आणि महासभेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!