
केज/प्रतिनिधी
दि.८ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्रात एचपीव्ही लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली.त्याच दिवशी केज जिल्हा उप रुग्णालयाच्या वतीने साने गुरुजी निवासी विद्यालयावर वर्ष १४ पूर्ण केलेल्या व पंधरा वर्षे पूर्ण न केलेल्या मुलींना देण्यात आली. सदर एचपीव्ही लस म्हणजे ह्युमन पाॅपिलोमा व्हायरस या विषाणूमुळे प्रजनन मार्गातील एक सामान्य संसर्ग होतो. गर्भाशय मुखाच्या (cerivix) कर्करोगाच्या बहुतांश रुग्णांमध्ये एचपीव्ही जबाबदार असतो.हा कर्करोग भारतीय महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगां पैकी दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग आहे या लसी मुळे गर्भाशय मुखाचा कर्करोग कमी होण्यास मदत होणार आहे.
दि.८ मार्च रोजी उपजिल्हा रुग्णालय केज येथे साने गुरुजी निवासी विद्यालयातील १३ मुलींना लसीकरण करून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी लसीकरणासाठी उप जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.दत्तात्रय केंद्रे, डॉ.इंगोले, संकुलाच्या प्राचार्य डॉ.कविता गीते – कराड मॅडम उपस्थित हे होते.तसेच या मोहिमेत सहभागी रुग्णालयाच्या डॉ.केशव इंगोले,डॉ. संजय पुसदेकर,डॉ. कृष्णा म्हात्रे,श्रीमती आशा पौळ,श्री.तळेकर, श्री.महाजन विजय,नर्स व ब्रदर्स यांनी लस देण्याचे काम यशस्वी रित्या पूर्ण केले.



