सामाजिक

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दीपावली निमित्त किराणा वस्तू वाटप,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व दैनिक समर्थ गांवकरी समूहाचा उपक्रम

बीड/प्रतिनिधी

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पूरामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे.अनेकांच्या घरातील धान्यसाठा, शेती तील पिके व जनावरांचे चारा याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अशा संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व दैनिक समर्थ गांवकरी समूह यांच्या वतीने दीपावली सणानिमित्त किराणा वाटप करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस व दैनिक समर्थ गांवकरी चे संपादक डॉ.विश्वासराव आरोटे यांच्या संकल्पने तून हा उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमाअंतर्गत पूरग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या घरपोच किराणा वाटप करून सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवण्यात आली.

या उपक्रमामुळे अनेक शेतकऱ्यांच्या कुटुंबीयां च्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून, दीपावलीचा खरा प्रकाश त्यांच्या घरात पोंहोच विण्याचे कार्य समर्थ गांवकरी समूहाने केले आहे. स्थानिक नागरिकांनी, शेतकऱ्यांनी या सामाजिक कार्याचे मनःपूर्वक स्वागत केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!