स्नेहालयाच्या सद्भावना यात्रेची जिल्हा परिषद माध्यमिक शाळा भाटुंबा येथे सदिच्छा भेट

केज/प्रतिनिधी
दि. ७ जानेवारी २०२६ रोजी स्नेहालय सेवाभावी संस्था अहिल्यानगर या संस्थेची सद्भावना यात्रा सायकलवर सुरू आहे. महाराष्ट्रातील तरुणाईत सामाजिक जाणिवेची प्रेरणा आणि ऐक्य भावना पेरणारी ही सद्भावना सायकल यात्रा दि.३० डिसेंबर २०२५ ते १२ जानेवारी २०२६ या काळात ही यात्रा नांदेड ते अहिल्यानगर अशी निघालेली आहे.या दरम्यानच्या प्रवासात ही यात्रा तरुणाईला संपन्न जीवनाचे तंत्र शिकवण्या साठी कार्यरत आहे.या ११ व्या यात्रे दरम्यान त्यांनी अनेक सामाजिक संस्था व शैक्षणिक संस्थांना भेटी दिल्या आहेत.विद्यार्थ्यांमध्येही जागृती निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
या यात्रेच्या काही स्वयंसेवकांनी केज तालुक्यातील नामांकित शाळा जिल्हा परिषद माध्यमिक शाळा भाटुंबा येथे भेट देऊन शाळेला सन्मानपत्र दिले.शाळा व परिसर पाहून आनंद व्यक्त केला.या शाळेने या यात्रेत सहभागी श्री. बाजीराव कानवडे व सौ. हिरा कानवडे हे दोघेही निवृत्त मुख्याध्यापक आहेत. तसेच श्री.रमेश धोत्रे श्री.अनिल वराडे श्री. राजेंद्र धायगुडे, श्रीराम पवार हेही जेष्ठ नागरिक आहेत.तसेच पुनम ठोंबरे संजना चव्हाण व स्नेहल गारुडकर सागर अशा तरुणींचा आणि तरुणांचा ही या यात्रेत समावेश आहे.यात्रेतील श्री. आदिनाथ ढाकणे हे गोदावरी नदी स्वच्छता अभियान प्रकल्पात कार्यरत आहेत.ते गावा गावातील नदी स्वच्छते साठी पोट तिडकेने नदीत केरकचरा फेकू नका असे आवाहन करतात.
प्लास्टिक वापरू नका असाही त्यांचा आग्रह आहे तर श्री.सचिन खेडकर हे ‘उचल’ या संस्थेच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांच्या मुलांचे संगोपन करतात. यावेळी सर्वांनी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच शाळेतील मुख्याध्यापक डॉ.श्री. कंचनवार सर तसेच सर्व शिक्षक शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी केला. शाळेत त्यांच्या संघाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले तसेच चहा नाश्त्याचे हे आयोजन करण्यात आले होते.



