प्रशासकीय

तहसील कार्यालय केज येथे दिव्यांग लाभार्थ्यां साठी विशेष पडताळणी मोहीम

केज/प्रतिनिधी

संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ योजने अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांसाठीशासनाच्या नवीन निर्णयानुसार, ऑक्टोबर 2025 पासून मासिक अनुदानाची रक्कम 1500 रूपये वरून थेट 2500 रुपये इतकी करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर, लाभार्थ्यांची पडताळणी करून अद्ययावत माहिती प्राप्त करण्यासाठी केज तहसील कार्यालयात विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे. राकेश गिड्डे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी,केज यांच्या सूचने नुसार,शनिवार दि. 11 ऑक्टोबर व रविवार दि.12 ऑक्टोबर 2025 रोजी साप्ताहिक सुट्टी असून सुद्धा तहसील कार्यालय, केज येथे ही विशेष मोहीम सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत राबविण्यात येत आहे.या मध्ये संजय गांधी योजना विभाग पूर्ण वेळ कार्यरत राहणार आहे.सदर मोहिमेअंतर्गत,आपल्या सज्जा अंतर्गत येणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांनी खालील आवश्यक कागदपत्रे स्वतः किंवा अधिकृत प्रतिनिधीद्वारे तहसील कार्यालयात सादर करावीत असे आवाहन करण्यात आले आहे.

1.ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र किंवा UDID कार्ड (कलर झेरॉक्स)

2.आधार कार्डची ई-प्रिंट (कलर झेरॉक्स) जी 2025 मध्ये सीएससी सेंटर किंवा सेतु सुविधा केंद्रातून नव्याने काढलेली असावी.

या मोहिमेमुळे लाभार्थ्यांना शासनाच्या वाढीव अनुदानाचा लाभ मिळवता येणार असून, संबंधित ग्राम महसूल अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे की, त्यांनी आपल्या सज्जा अंतर्गत लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती वैयक्तिकरित्या पोहोचवावी.तसेच,ही माहिती सोशल मिडिया वरील स्थानिक गटांमधून प्रसारित करण्यात यावी, जेणेकरून अधिकाधिक लाभार्थ्यांना वेळेतमाहिती मिळेल आणि कागदपत्रे सादर करून लाभ घेणे शक्य होईल असे तहसीलदार तथा न्याय दंडाधिकारी श्री.राकेश गिड्डे म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!