राजकीय

भाजप जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला लागली, पर्यावरण तथा पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत बहुसंख्य कार्यकर्त्यांनी केला भारतीय जनता पक्षात प्रवेश 

केज/प्रतिनिधी

भारतीय जनता पक्ष जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी सज्ज झाला असून केज तालुक्यातील शिरूरघाट येथील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

याप्रसंगी सर्वांना प्रवेश देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले.आगामी काळात पक्षाचे ध्येयधोरण आणि विकासकामे ना.पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी सक्रिय राहून पक्षकार्य करू असा निर्धार याप्रसंगी सर्वांनी व्यक्त केला.

यावेळी शिरूरघाट ता.केज येथील माजी सरपंच सुंदर हजारे, अशोक गायकवाड, नवनाथ धेंडूळे,रवींद्र विडेकर,आश्रुबा घोडके, मारुती लोंढे,दिनकर केकाण,विकासभवलकर, रामेश्वर हजारे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.बुधवारी संपन्न झालेल्या पक्षप्रवेशामुळे येणाऱ्या काळात पक्षाला निश्चित संघटनात्मक बळकटी मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

याप्रसंगी संतोष हांगे,भगवान केदार,  विष्णू भाऊ घुले,डॉ.वासुदेव नेहरकर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रवेशा मुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!