सामाजिकसांस्कृतीक

आज आडस येथे रमेश आडसकर यांचा दीपावली पाडवा सोहळा उत्साहात साजरा होणार,आडसकर परिवाराच्या वतीने सर्वांना दिवाळी फराळाचे निमंत्रण

केज/प्रतिनिधी

लोकनेते स्व.बाबुरावजी आडसकर तात्या यांनी चालु केलेला दिवाळी पाडवा मनोमिलन परंपरेचा वारसा दीपावली पाडव्याचा पारंपरिक सोहळा विविध मान्यवर यांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे. आडसकर परिवारातर्फे आयोजित दीपावली पाडवा समारंभ दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता,आडस,ता.केज, जि.बीड येथे आयोजित करण्यात आला आहे.

दीपावली पाडवा हा हिंदू संस्कृतीतील स्नेह,सौहार्द व नवचैतन्याचा दिवस असून,या निमित्ताने सर्व समाजातील सर्व स्तरा तील बांधवांना एकत्र आणण्याचा हेतू या कार्यक्रमामागे आहे. पाडवासण समाजातील नात्यातील सन्मान,प्रेम आणि सुदृढ बंध दर्शवणारा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे हा सोहळा दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि रमेश आडसकर परिवाराने नियोजन केले असून, परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर या वेळी आवर्जुन उपस्थिती लावत आहेत.

दिवाळी पाडव्याच्या मंगलमय वातावरणात सर्व उपस्थितांच्या गाठीभेटी होऊन आनंदाचा अनुभव घेण्यासाठी आडसकर परिवारावर प्रेम करणारे लोक एकत्र येतात.या कार्यक्रमास स्थानिक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते,व्यापारी तसेच ग्रामस्थ उपस्थित राहणार असून,पाडव्याच्या निमित्ताने सर्वांना दिवाळी फराळाचे ही आयोजन करण्यात आले आहे.या

कार्यक्रमाचे आमंत्रण देताना आडसकर परिवाराने सर्व समाज बांधवांना एकत्र येऊन दीपोत्सवाचा आनंद साजरा करण्याचे आवाहन केले आहे.या कार्यक्रमासाठी केज, अंबाजोगाई,माजलगाव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित रहाणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!