
केज / प्रतिनिधी
जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून अतिवृष्टी सुरू आहे, अनेक तालुक्यात मोठा पाऊस झाला आहे, यामुळे क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे त्यांचा विसर्ग ही वाढलेला आहे, परिसरातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत.
केज तालुक्यातील मांजरा धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे व धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज दिनांक 15/ 9 /2025 रोजी 17.30 वाजता गेट क्रमांक(1,3,4,6) हे चार गेट 0.25 मीटरने उचलण्यात आले आहेत. सद्यस्थितीत मांजरा धरणाच्या सांडव्याची चार वक्रद्वारे क्रमांक (1,3,4,6) 1.250 मीटरने आणि दोन वक्रद्वारे क्रमांक 2 व 5 एक मीटरने चालू असून मांजरा नदीपात्रात 21570.17 क्युसेक्स (610.880 क्युसेक्स) इतका विसर्ग सुरू आहे.
धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येईल तरी नदीकाठावरील पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, नागरिकांनी अत्यंत महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये,प्रकल्पातून निसर्ग वाढल्यानंतर काही समस्या उदभवू नये यासाठी मांजरा प्रकल्प धनेगाव पूर नियंत्रण कक्षाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.



