
केज/ प्रतिनिधी
स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता. केज जि.बीड च्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी ” गुरु नानक यांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली.दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी थोर क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली.
दिनांक २३ ऑक्टोबर २०२५ ते ३ नोव्हेंबर २०२५ या दरम्यान आयोजित दिवाळी अंक व नियतकालिके प्रदर्शनाचा समारोप दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आला.समारोप कार्यक्रमाला माजीसरपंच रामराजे गायकवाड, अरुण गायकवाड, नारायण गायकवाड, संजय सोनवणे,एस.के. वैरागे,दादासाहेब गायकवाड,रविंद्र गायकवाड,ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड यांच्यासह वाचकांनी सहभाग घेतला.
दिनांक ३१ऑक्टोबर २०२५ रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली.दिनांक २९ ऑक्टोबर २०२५ रोजी जलाराम जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. सर्व कार्यक्रम व उपक्रम हे ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष ,जेष्ठ विचारवंत, जेष्ठ समाजसेवक , महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते व परखड व्याख्याते, प्राचार्य, डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.सर्व कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड यांनी केले.सर्वच कार्यक्रमात वाचकांचा सक्रीय सहभाग होता.



