सामाजिक
रमेश भिसे यांच्या मातोश्री सगजानबाई भिसे यांचे निधन

केज / प्रतिनिधी
केज तालुक्यातील सुर्डी येथील कै. सगजानबाई विनायकराव भिसे यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी अंबाजोगाई येथे उपचारादरम्यान निधन झाले. शांत,मनमिळाऊ,मितभाषी स्वभावाच्या सगजानबाई विनायकराव भिसे गेल्यामुळे सुर्डी परिसरात व जनविकास परिवाराला मानणाऱ्या वर्गात शोककळा पसरली आहे.
यांच्या पश्चात एक मुलगा,सुन,नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या जनविकास सेवाभावी संस्थेचे सचिव रमेशरावजी भिसे यांच्या मातोश्री होत्या,दि.०५ नोव्हेंबर २०२५ बुधवार रोजी सकाळी नऊ वाजता सुर्डी येथे त्यांच्या वर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.



