हिन्दराष्ट्र संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी राधाताई सपकाळ यांची नियुक्ती

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील केकतसारणी येथील रहिवाशी असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सौ.राधाताई सपकाळ यांची हिन्दराष्ट्र संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी यांची नियुक्ती करण्यात आली असुन त्यांच्यावर विविध क्षेत्रातुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.हिंदराष्ट्र संघाची उद्दिष्टे,कार्यक्रम व धोरण हे हिंदराष्ट्र एकविचारधारा आहे,नैतिकतेचा आधार आहे,अस्तित्वाचा शोध आहे व स्वताची ओळख आहे.हिन्दराष्ट्र संघ भारतीय संविधाना नुसार चालणारी संस्था आहे, आधुनिक भारत आहे, प्रजातंत्र राज्य आहे, आपल्या शक्तिचे प्रमाण आहे, नैतिक मुल्यांचे विधान आहे,प्रजातंत्राची ओळख आहे,समृध्द, सुदृढ राष्ट्राचा संकल्प आहे.
हिंदराष्ट्र संघाची स्थापना ही भारतीय संविधानाच्या प्रति आदर असलेल्या तीव्र निष्ठेतुन झाली आहे. संघाच्या विकासाची सुरूवात त्यातुन निर्माण होणाऱ्या ऐतिहासिक संस्कृती तसेच त्याचे संवर्धन, विकास व जागतिक स्तरावर शांतता आणि अन्यायाविरुद्ध न्याय व्यवस्था स्थापित करणे हे हिंदराष्ट्र संघाचे मुख्य उद्दिष्ट आहे.मानवी विकास हेतु हिंदराष्ट्र संघ हा मुलभुत गरजांवर कार्य करतो ते पुढीलप्रमाणे आहेत.सिध्द कृषि (अन्नसुरक्षा),प्रकृति उन्मुख शिक्षा (शिक्षण) आणि मल्टीसिध्दा षट्कर्म चिकित्सा (आरोग्य),पक्षाला भारतीय संविधानावर दृढ विश्वास व निष्ठा आहे.
पक्ष धर्मनिरपेक्षता,लोकशाही व भारताच्या सार्वभौमत्वाचे,एकतेचे आणि अखंडतेच्या तत्वाचे पालन करेल.निर्भयता, सत्यशीलता,निस्वार्थ, प्रेमपूर्ण भाव या व्यक्तिमत्वाला निर्माण करणे तसेच मानवी मुल्यांचा व गूणांचा विकास करणे.’वसुधैव कुटुम्बकम्’ (सम्पुर्ण विश्व एकच कुटूंब आहे) ही संकल्पना साकार करणे, मानवता एकधर्म,एकराष्ट्र, एकध्वज,एकसमान शिक्षण,एक समान न्याय, व समान आरोग्य सेवा या आधारावर व्यवस्था तयार करणे.
मानवी नैतिक मुल्यांच्या आधारावर शिक्षण व्यवस्था उभारणे व कौशल्य विकासाच्या आधारावर युवकांना स्वयंरोजगाराला सक्षम करून नव्याने लोकशाही स्थापित करणे.गुरुकुल शिक्षण प्रणालीचा अवलंब करून वैदिक संस्कृतीचे रक्षण करणे. मानवता व निसर्गयांच्यात सुसंवाद राखणे.विज्ञान व अध्यात्माव्दारे मानवी स्वयं विकास करणे,बाह्य विकास,अंतर्गत विकास, आणि राष्ट्र विकास या त्रिसुत्री विचाराच्या आधारावर विश्व विकासाला प्राधान्य देणे.
वंशवाद,वर्णवाद,पुंजीवाद,जातिवाद,धर्मवाद या एकल नीतींचा निषेध करणे.मानवाव्दारे निर्मित विविध संस्कृतीचा सन्मान व रक्षण करणे असे संघाचे उद्दिष्ट आहेत. दरम्यान सध्यस्थितीत या विचाराने चालणे गरजेचे आहे अशा संस्थेशी निगडीत राहुन समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली याचा अभिमान आहे अशी प्रतिक्रिया सौ.राधाताई सपकाळ यांनी दिली आहे.



