असोला येथील रामदास चोले यांचे एमपीएससीत यश, राज्यातुन मिळवला ९० वा क्रमांक ; सहाय्यक आयुक्तपदी निवड

धारूर/प्रतिनिधी
धारूर तालुक्यातील असोला या छोट्याशा गावाचा सुपुत्र रामदास नामदेव चोले यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी २०२४-२५ च्या संयुक्त गट-अ पूर्वपरिक्षेत राज्यातुन ९० वा क्रमांक पटकावत राज्य कर विभागातील सहाय्यक आयुक्त या प्रतिष्ठित पदावर निवड मिळवली आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीने संपूर्ण धारूर तालुक्यासह बीड जिल्ह्याचा मान उंचावला आहे. असोला गावात ही बातमी कळताच जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. गावकऱ्यांनी त्यांच्या घरी भेट देत फटाक्यांच्या आतषबाजीत व ढोल- ताशांच्या गजरात अभिनंदन केले.तरुणांना मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या रूपाने ते प्रेरणादायी ठरत आहेत.
परिस्थितीशी दोन हात करून यश संपादन
रामदास यांचे प्राथमिक शिक्षण असोला येथील जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण धारूर येथे पूर्ण झाले.घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असुन त्यांच्या आईवडिलांनी ऊसतोडणी मजूर म्हणून अनेक वर्षे कष्ट उपसले आहेत मात्र मुलांच्या शिक्षणासाठी कधीही माघार घेतली नाही.
आई-वडिलांच्या त्यागातून मिळालेली प्रेरणा, स्वतःची चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले.परिस्थिती नव्हे, तर इच्छाशक्ती आणि मेहनतच यश ठरवते” हे त्यांनी आपल्या जीवना तून सिद्ध केले आहे.
असोला गावाला अभिमान स्वागत कार्यक्रमाची जय्यत तयारी
रामदास यांच्या यशाचे सेलिब्रेशन करण्यासाठी गावात विशेष स्वागत समारंभ आयोजित करण्याची तयारी सुरू असून सामाजिक संघटनांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.युवा वर्गात एमपीएससी बाबत नव्या उत्साहाची लहर निर्माण झाल्याचे चित्र आहे.कुटुंबातील आनंदाश्रू
वडील नामदेव जयवंता चोले व आई यांनी ऊस तोडणीच्या कष्टांनंतर मुलाने मिळवलेल्या या यशामुळे अभिमानाने डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले.आमच्या कष्टांचे चीज झाले अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.



