सामाजिक
आनंदगाव येथील जेष्ठ नागरिक रामराव भोगजकर यांचे दुखःद निधन

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील आनंदगाव येथील जेष्ठ नागरिक, वारकरी संप्रदायाचा पुरस्कार करणारे वारकरी रामराव येडबा भोगजकर वय १०५ वर्ष यांचे शनिवार दिनांक १ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी दिवशी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.त्यांच्यावर आनंदगाव येथे शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.सांप्रदायिक क्षेत्रातील निष्ठावान वारकरी, कष्टाळू प्रेमळ स्वभावाचे अण्णा सर्वपरिचित होते.
त्यांच्या पश्चात पत्नी,पाच मुले सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.ते जनक ,माणिक ,शंकर आश्रूबा, उद्योजक पांडुरंग भोगजकर यांचे वडील होत.त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



