सांस्कृतीक

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त स्वानंद सार्वजनिक वाचनालयातग्रंथप्रदर्शन,व्याख्यान,चर्चासत्र संपन्न.

केज/प्रतिनिधी

स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगाव ता.केज जि.बीड येथे ” मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी ग्रंथप्रदर्शन,व्याख्यान, चर्चासत्र इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. सर्वप्रथम मराठवाडा मुक्ती संग्रमाचे प्रणेते, स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेला पुष्पहारअर्पण करून पुजन व वंदन करण्यात आले.त्यानंतर ग्रंथप्रदर्शन,व्याख्यान, चर्चासत्र कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.अंजना गोविंद गायकवाड या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत अधिकारी डि.एस.सरदे,ग्राम पंचायतऑपरेटर विजय थोरात,सहशिक्षक अभिजित शिंदे, सुर्यकांत धायतिडक, रवि गायकवाड यांची उपस्थिती होती.यावेळी ग्रामपंचायत अधिकारी डि.एस.सरवदे यांनी गंथालयाच्या दैनंदिन कामकाजा बरोबरच विविध सामाजिक उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम राबवून गावाला दिशा देण्याचे काम होत असल्याचे मत व्यक्त केले.यावेळी विजय थोरात, अभिजित शिंदे, सुर्यकांत धायतिडक, रवि गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले. उद्घाटणीय सत्राचा अध्यक्षीय समारोप सरपंच सौ.अंजना गोविंद गायकवाड यांनी केला. दुसऱ्या सत्रात ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष, जेष्ठ विचारवंत, जेष्ठ समाजसेवक, परखड व्याख्याते प्राचार्य डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांचे व्याख्यान संपन्न झाले.

आपल्या व्याख्यानात मराठवाडा निजाम शाहीत असल्यामुळे मागास राहिला व विकासापासून वंचित राहिल्याचे सांगून जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात मराठवाडा १७ सप्टेंबरल मुक्त झाला. यासाठी अनेकांनी आपले बलिदान दिले आणि आपण हैद्राबाद च्या निजामशाहीतुन मुक्त झालो असे प्रतिवादन डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले.यावेळी विचार पीठावर कमलाकर साबळे,रविंद्र गायकवाड,विजय गायकवाड,अरुण गायकवाड,बाळासाहेब गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

त्यानंतर घेण्यात आलेल्या चर्चासत्रात रामकृष्ण तात्या गायकवाड,रविंद्र गायकवाड,बापूराव गायकवाड, कमलाकर साबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.ग्रंथप्रदर्शन, व्याख्यान ,चर्चासत्र कार्यक्रमाला विठ्ठल भोगजकर, भास्कर गायकवाड, सुरेश घोगले, शिवाजी शिंदे, माणिकराव गायकवाड, बंडू पौळ, वेदिका गायकवाड, दिव्या साबळे,विरा सोनवणे, रमेशराव गायकवाड, माजी सरपंच रामराजे गायकवाड , रावसाहेब जाधव,संजय सोनवणे, कृष्णराजे गायकवाड, यश गायकवाड, सोहम गायकवाड,कृष्णा गायकवाड,नारायण गायकवाड, हरिभाऊ गायकवाड,बबन पुंड, यांच्यासह वाचक, हितचिंतक, विद्यार्थी, युवक,जेष्ठ नागरीक यांची उपस्थिती होती. सर्व कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सुत्रसंचलन, आभारप्रदर्शन ग्रंथालयाचे आनंदभैय्या गायकवाड यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!