केज येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम

केज/प्रतिनिधी
दिनांक 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्ताने केज येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.हा उपक्रम होमगार्ड जिल्हा समादेशक श्री.सचिन पानकर साहेब व केंद्र नायक श्री.सुरेश झवेरी सर यांच्या आदेशानुसार राबविण्यात आला.
या उपक्रमाचे आयोजन केज तालुका समादेशक राऊत दिनकर व सुनील कुलकर्णी,चाटे राजाभाऊ पलटण नायक,गणेश वाघमारे पालटण नायक व केज होमगार्ड पथक यांच्या वतीने करण्यात आले.
या वेळी तालुका समादेशक राऊत दिनकर यांनी सांगितले की ,आज लावलेले झाड हे फक्त एक रोप नाही, तर उद्याच्या पिढ्यांसाठी आपले हिरवे वारस आहेत. मराठवाडामुक्ती संग्रामातील शूरवीरांनी देशाच्या. स्वातंत्र्यासाठी त्याग केला , त्याच प्रेरणेने आपणही समाजासाठी , निसर्गा साठी योगदान देणे आवश्यक आहे. यापुढेही अशा उपक्रमांतून होमगार्ड दल समाजहितासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी सतत कार्यरत राहील. या कार्यक्रमात होमगार्ड पथकातील जवानांनी उत्साहाने सहभाग घेतला.



